आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today 24th June: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे चित्र आहे. आज सोमवारी 24 जून रोजी भारतीय वायदे बाजारात सकाळी सोन्याच्या दरात घट झाली आहे तर, चांदीचे दरात वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट झाली आहे. तर, MCX वर चांदीच्या दरात 120 रुपयांनी दर वाढले आहेत. 

शुक्रवारी वायदे बाजारात 1000 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. तर, चांदीदेखील 2500 रुपयांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वाढल्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे  चित्र आहे. डॉलर मजबूत झाला असून 0.2% ने वाढून  7 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर रोखे उत्पन्न देखील वाढले होते, ज्यामुळे सोने 1 टक्क्यांनी घसरले होते. स्पॉट गोल्ड 1.7% घसरून $2,319 प्रति औंस झाले आहे. US Gold Future 1.6% च्या घसरणीसह $2,331 वर बंद झाला.

हेही वाचा :  Gold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! शुद्ध सोनं आणखी स्वस्त; खरेदी करण्याची सुवर्णसंधी

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 250 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 230 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 210 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 625 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 223 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 421  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 000 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 784 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 368  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66, 250 रुपये
24 कॅरेट-  72, 230 रुपये
18 कॅरेट-  54, 210 रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …

…मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुक

Manoj Jarange Patil Emotional Appeal: मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आमदारांना साद घालताना …