सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्या

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्या

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी भारतीय वायदे बाजारत आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चिन्हे आहेत. MCX वर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोनं 88 रुपयांनी घसरून 71,651 वर स्थिर झाले आहे. तर, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 71,739 इतकी होती. चांदीच्या दरातही 180 रुपयांची घट झाली आहे. आज चांदी 88,900 रुपयांवर स्थिर आहे. मंगळवारी चांदी 89,080 वर स्थिरावली होती. 

मागील सत्रात रुपयाची 83.57$वर नोंद झाली होती. मात्र, आता यात रिबाउंड आलं आहे. आज रुपया 83.38/$ वर व्यवहार करत आहे. रुपया मजबूत झाल्यानंतर आज बुलियन्स मार्केटमध्ये तेजी आली आहे. सोन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली आहे. अमेरिकेत मौल्यवान धातुच्या खरेदीत वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक या वर्षी व्याज दरात कपात करणार आहे. स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी वाढून 2,329 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. तर, यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून 2,346 डॉलरवर स्थिर झाला आहे. 

हेही वाचा :  स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, काय आहे आजची किंमत?

आज मुंबईत सोन्याचा दर काय?

आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 71,280 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 65,300 इतका आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याचा दर

1 ग्रॅम- 7,128
8 ग्रॅम- 57,024
10 ग्रॅम-71,280

आज 22 कॅरेट सोन्याचा दर

1 ग्रॅम- 6,530
8 ग्रॅम- 52,240
10 ग्रॅम-65,300



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून …

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. …