Viral News : नोकरी द्या नाहीतर बालपणीचं प्रेम…. Job मिळवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल

Viral News : आपण अनेक चित्रपटामध्ये पाहिले आहे, जेव्हा अभिनेता हा अभिनेत्रीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी पालकांसमोर उभा राहतो. तेव्हा अभिनेत्रीचे वडील अभिनेत्यासमोर ठराविक रक्कम कमावून आण आणि मग मााझ्या मुलीशी लग्न कर अशी अट ठेवतात. खऱ्या आयुष्यात सहसा आपण असं कधी पाहिलं नाही की ऐकलं नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये नोकरीचा अर्ज करताना त्याने विनंती केलीय. ती विनंती ऐकूण तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. 

एका महाशयाने नोकरी मिळवण्यासाठी कमालीचा अर्ज केलाय. या अर्जाची पोस्ट त्या कंपनीच्या सीईओने सोशल मीडियावर शेअर केलीय. त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होते आहे. नोकरीसाठी महाशयाची शक्कल नेटकऱ्यांना आवडली आहे. 

काय आहे या नोकरीच्या अर्जात?

अर्वा हेल्थ नावाच्या कंपनीने भरतीसाठी जाहिरात दिली होती, त्यानंतर अनेक अर्ज या कंपनीला आलेत. कंपनीला स्टार्टअपसाठी इंजिनियरची आवश्यकता होती. कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ दीपाली बजाज यांना एक अर्ज पाहून धक्काच बसला. तो अर्ज पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. दीपाली यांनी हा अर्ज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. दीपाली यांची कंपनी ही अर्वा हेल्थ हे हेल्थकेअर स्टार्टअप असून यामध्ये महिलांना घरच्या घरी प्रजनन चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. 

हेही वाचा :  'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?

कंपनीने उमेदवारांना नोकरीसाठी जो फॉर्म भरायला लावला, त्या फॉर्ममध्ये तुम्ही या नोकरीसाठी योग्य का आहात असा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर उमेदवाराने लिहिलं की, ‘मला वाटते की या पदासाठी आवश्यक असलेली अद्वितीय क्षमता माझ्याकडे आहे आणि मी ती पूर्ण करतो. जर मला ही नोकरी मिळाली नाही तर मी माझ्या बालपणीच्या प्रेमाशी कधीच लग्न करू शकेल. माझ्याकडे नोकरी असेल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करू शकतो, असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान या व्यक्तीची निवड झाली की नाही हे कळू शकलेले नाही.

उमेदवाराच्या या उत्तरावर सोशल मीडियावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, ‘त्याला कामावर घ्या कारण गरीबांचा आशीर्वाद असेल.’ दुसऱ्या यूजरने लिहिलंय की, ‘मला नोकरी द्या’. आणखी एका युजरने लिहिलंय की, जर त्याला नोकरी मिळाली तर मी ही शक्कल वापरेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

14 गडी, 11 जागा…! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Maharastra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट …

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. …