डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. याबद्दलचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. 

आगीसंदर्भात एमआयडीसीने सविस्तर माहिती दिली आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी आग लागलीय…अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनी जवळ, एम.आय.डी.सी. फेज-०2, सोनारपाडा, डोंबिवली (पुर्व). या ठिकाणी डोंबिवली एम.आय.डी.सी. मध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. 

डोंबिवली एम आय डी सी मधील बाजूला आसलेल्या हुंडाई शोरूम ला आग लागली आहे. आजू बाजूच्या राहणाऱ्या नागरिकांन सुरक्षा स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये 30 ते 40 लोक जखमी  असून त्यांना डोंबिवलीच्या एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

या स्फोटात 5 ते 6 कर्मचारी यांना दुखापत झालीय…स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय…सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन केंद्रातून यासंदर्भात अपडेट देण्यात येत आहे. 

घटनास्थळी स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
मे. मेट्रोपॉलिटन कंपनी, मे. के.जी. कंपनी, मे. अंबर केमिकल कंपनी इत्यादी कंपनीमध्ये भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा :  Viral Video : 'या' महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने...

घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाची वाहने उपस्थित आहेत. त्यामध्ये एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह,  डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह,  पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी …

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज …