Bank Holidays List : बँकेची कामं आताच उरकून घ्या; पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद

Bank Holidays List : दैनंदिन जीवनात हल्ली प्रत्क्षरित्या बँकेत जाऊन करण्याच्या कामांचं प्रमाण कमी झालं असलं तरीही काही कामं अशी आहेत ज्यासाठी बँकांमध्ये जाणं तितकंच गरजेचं असतं. ऑनलाईन पद्धतीनं अनेक कामं अगदी सहजरित्या होत असतानाच काही कामांसाठी मात्र बँकेची पायरी चढावी लागते. तुम्हीही असंच एखादं काम ताटकळत ठेवलं आहे का? तर ती तातडीनं उरकून घ्या. अन्यथा ही कामं आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

20 मे 2024, सोमवार या दिवशी देशातील काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 5th Phase voting) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळं ज्या शहरांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तिथं (Bank Holidays) बँकाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 19 मे रोजी बँकांची आठवडी सुट्टी आणि त्यानंतर 20 तारखेच्या सोमवारीही बँका बंद राहणार असल्यामुळं अनेकांचीच तारांबळ उडण्याची शक्यता असणार आहे. 

निवडणूक प्रक्रिया (Loksabha Election), मतदान असणाऱ्या शहरांमध्ये टप्प्यांनुसार बँका बंद राहतील असे निर्देश (RBI) रिझर्व्ह बँकेकडूनच देण्यात आले होते. परिणामी 20 मे रोजी राज्यातील 6 राज्य आणि 49 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असल्यामुळं बँका बंद राहतील. 

हेही वाचा :  'ख्याल रखना लँडर भाई...'; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स

बँका बंद असणाऱ्या राज्यांमध्ये (Ladakh) लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे. देशाच्या उर्वरित राज्यांमध्ये मात्र बँका सुरु राहणार आहेत. मुंबई आणि बेलापूर येथील बँका मात्र या दिवशी पूर्णपणे बंद राहणार असल्याची खातेधारकांनी नोंद घ्यावी. 

मे महिन्याच्या अखेरिस उरलेल्या सुट्ट्यांविषयी सांगावं तर, 23 मे रोजी बुद्धपौर्णिमा आणि 25 मे रोजी मतदानाचा सहावा टप्पा असल्यामुळं पुन्हा एकदा विविध शहरातील बँका बंद राहतील. 25 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि 26 मे रोजी रविवार अशी बँकांची आठवडी सुट्टी असेल. त्यामुळं येत्या आठवड्यात बँका अवघे चार दिवस सुरु राहणार आहेत. बँकांचा प्रत्यक्ष कार्यालयीन व्यवहार बंद राहणार असला तरीही डिजिटल बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम आणि नेट बँकिंग अशा पद्धतीनं मात्र आर्थिक व्यवहार सुरु राहणार आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …