लातूरच्या कन्येची बाजी ; भारतीय वनसेवा परीक्षेत देशात दुसरी !

UPSC Success Story : प्रतिक्षाने सिव्हील सर्व्हिसेस मध्येच करिअर करायचे ध्येय सातवी, आठवीतच ध्येय निश्चित केले होते. त्यानुसार ती पावले टाकत राहिली. नुकत्याच लागलेल्या निकालात भारतीय वनसेवा परीक्षेत लातूरची प्रतीक्षा देशात दुसरी, राज्यात पहिली आली आहे.‌प्रतीक्षा काळे या मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून आहेत. तिने लोकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे़. करीअर आणि एज्युकेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत़. अभियांत्रिकीची पदवी घेताना तिच्याकडे रोजगार म्हणून कधीच पाहिले नाही़. त्यामुळे तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जिद्दीने केला.

तिचे शालेय शिक्षण हे लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण झालेल्या प्रतिक्षा काळे हिचे माध्यमिक शिक्षण प्रकाशनगरमधील सरस्वती विद्यालयात झाले. ११ वी, १२ वी विज्ञान राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. पुढे तीने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीओईपी) येथे बी-टेकचे शिक्षण पूर्ण केले. तिची आई गृहिणी, वडील नानासाहेब काळे राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापक आहेत़. तिला लहानपणापासूनच घरात शैक्षणिक वातावरण आणि करिअर निवडायचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तिने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. आपल्या निर्णयावर कायम ठाम राहिली.

त्यामुळेच, लोकसेवा आयोग(युपीएससी) परीक्षा २०२३ मध्ये लातूरची कन्या प्रतिक्षा नानासाहेब काळे हिने घवघवीत यश मिळावले असून तिला ऑल इंडिया सेकंड रॅक मिळाला आहे. ती सध्या मेळघाट परतवाडा अमरावती विभाग येथे सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) या पदावर वर्ग-१ अधिकारी म्हणुन कार्यरत आहे.

हेही वाचा :  विनापरीक्षा थेट भरती, ECIL मध्ये ITI पाससाठी 1625 पदांची भरती ; पगार 24000

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भावाचे मार्गदर्शन आणि घरच्यांचा पाठिंबा; डॉ. नेहा झाली प्रशासकीय अधिकारी !

UPSC Success Story : खरंतर आयुष्याच्या वळणावर अनेक करिअरच्या वाटा बदलत असतात. त्यातून नवनवीन शिकवण …

लातूरच्या कन्येची UPSC परीक्षेत बाजी; आयएफएससाठी झाली निवड

Success Story UPSC : प्रतिक्षाला लहानपणापासून अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी तिने ध्यास घेतला. त्या ध्यासापायी …