‘भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच’ उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. कोकणातले सहा आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेले आहेत. त्यामुळे कोकणात नव्याने पक्षसंघटना बळकट करण्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा असून या  दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतायत. तसंच जाहीर सभादेखील होतेय. गद्दारांना टकमक टोकावून ढकलून द्यायचं आहे असं ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

आपल्या कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी भाजवप हल्ला बोल केला आहे. भाजपनं चारशेपारचा नारा दिलाय. पण हे कसे चारशे पार जातात तेच बघतो असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला (BJP) दिलंय. पक्ष चोरला, नाव चोरलं आता ईडी लावतायत असा आरोप त्यांनी केला. जेवढे भ्रष्ट ते भाजपात घेतेल, ही मोदी गॅरंटी का असा टोला त्यांना लगावला. जर अडचणीच्या काळात शिवसेनाप्रमुख पाठिशी राहिले नसते तर अटलबिहारी वाजपेयींनी तुमचे काय केले असते बघा.ऋण लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

हेही वाचा :  मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी रायगडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांच्यावर टीका केली. भरत गोगावले लावादासमोर साक्ष देताना म्हणाले शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून आम्ही गेलो. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायची लायकी आहे काय ? शिवाजी महाराज स्वराज्यासाठी सुरतला गेले होते,  इंग्रजांची वखार लुटायला गेले होते आणि हे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पायी घालीन लोटांगण करायला गेले होते हा फरक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सवाल विचार तटकरेंवर हल्लाबोल केलाय. भाजपला तटकरेंची घराणेशाही कशी चालते?…तुमची पालखी वाहतायत म्हणून गद्दारांची पिलावल तुम्हाला चालते का…? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. तर स्वप्नातल्या पालकमंत्र्यांची जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना असा टोला गोगावलेंना लगावलाय.

रायगड दौऱ्याचा दुसरा दिवस
उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पोलादपूर, म्हसळा आणि माणगावातील पदाधिकारी, कार्यकर्त्याची भेट घेऊन संवाद साधतायत.  शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात सभा झाल्या. कालपासून उद्धव ठाकरेंनी मिशन कोकण हाती घेतलं असून या दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय.

हेही वाचा :  'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …