दीपिकानं चाहत्यांना दिली Good News? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

Deepika Padukone Become Mother : गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी आपल्याला गोड बातमी देत असल्याचे पाहायला मिळते. त्यातील काही सेलिब्रिटी कपल आहे, ज्यांचे चाहते गूड न्यूजची प्रतिक्षा करत आहेत. त्यापैकी एक कपल म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. या दोघांनी 2018 मध्ये सप्तपदी घेतल्या होत्या. त्या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. अशात त्यांचे चाहते त्यांच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन कधी होणार या बातीची प्रतिक्षा करत असताना, दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात दीपिका आई झाल्याचं म्हटलं आहे. चला तर जाणून घेऊया की या बातमीत किती सत्य आहे. 

फेसबूकवरून एक पोस्ट सध्या व्हायरल होते. या पोस्टमध्ये दीपिकाचे काही फोटो आहेत ज्यात ती हॉस्पिटलमध्ये असून तिच्या हातात एक बाळ आहे.  हा फोटो शेअर करत त्या अकाऊंटवरून असं कॅप्शन देण्यात आलं आहे की दीपिका आई झाली आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका आणि रणवीरला सगळेच शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, त्यावर त्या दोघांनी अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. ही पोस्ट अन्विका नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत; म्हणाली, 'बेशरम रंग नाही तर लोकांचे...'

Deepika Padukone Become Mother know the fact check

दरम्यान, या बातमीत काहीही तथ्य नाही. दीपिकाचे हे फोटो एडिट करण्यात आले आहेत. नुकतीच दीपिकानं वोब सिंगापुरला दिलेल्या मुलाखतीत फॅमिली प्लॅनिंगवर वक्तव्य केलं आहे. दीपिकानं सांगितलं की ‘रणवीर आणि मला मुलं फार आवडतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेनं प्रतिक्षा करतोय जेव्हा आमच्या कुटुंबात एका छोट्या पाहुण्याचं आगमन होईल.’ 

पुढे दीपिका म्हणाली, ‘जेव्हा मी त्या लोकांना भेटते ज्यांच्यासोबत मी लहाणाची मोठी झाली आहे. म्हणजेच माझी काकू, काका आणि माझे फॅमिली फ्रेंड्स. ते देखील मला म्हणताता की तू जसी होती तशीच आहेस. हे आम्हाला मिळालेले संस्कार दाखवतात. या इंडस्ट्रीत लोकप्रियता आणि पैसा मिळालाकी लोक बदलतात. मात्र, घरी असल्यावर मला सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत नाही, तिथे मला आधी मिळायची तशीच वागणूक मिळते.’ 

हेही वाचा : अयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं?

दीपिका पुढे म्हणाली की ‘एक अभिनेत्री होण्याआधी मी एक मुलगी आणि बहीण आहे. हे बदलाव असं मला कधीच वाटत नाही. माझं कुटुंब मला जमिनीशी जोडून ठेवतं. मी आणि रणबीर देखील आमच्या मुलांना हेच शिकवण देऊ.’ दीपिकानं केलेल्या या वक्तव्यानं ते लवकरच आपल्या चाहत्यांना गूड न्यूज देतील ही आशा सगळ्यांना आहे.

हेही वाचा :  Twitter Down: ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …