शोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा

Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Posts Wedding : 20 जानेवारी रोजी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं. त्याच्या निकाहच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला होता की शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोट झाला की नाही याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता सानियाची टीमनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली असून. त्यासोबत शोएबला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

सानियाच्या टीम आणि कुटुंबानं यात लिहिलं की सानियानं कायम तिचं आयुष्य हे खासगी ठेवलं आहे. तिनं कधीच त्यावर पब्लिकली चर्चा केली नाही. दरम्यान, आज तिला या सगळ्याची गरज भासली आहे. ती सांगू इच्छिते की तिचा आणि शोएबचा घटस्फोट होऊन बरेच महिने झाले आहे. ती शोएबला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते!

पुढे त्यांनी म्हटले की ‘आताच्या तिच्या भावनिक काळात, आम्हाला तिच्या चाहत्यांना आणि शुभेच्छूकांना एक विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीचा तर्क लावू नका किंवा अंदाज बांधू नका आणि त्यासोबतच तिच्या भावनांचा आदर करा.’

Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Wedding and talked about divorce

दरम्यान, शोएबनं त्याच्या तिसऱ्या लग्नानंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. यावरून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटीचा विषय चर्चेत आला होती. आता सानिया मिर्झाच्या टीमनं यावर प्रतिक्रिया देत यागोष्टीला पूर्णविराम लावला आहे. 

हेही वाचा :  खंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...

सानिया आधी झालं आयशा सिद्दीकीशी लग्न

2010 मध्ये शोएब आणि सानियाच्या लग्ना आधी आयशा सिद्दीकी आणि त्याचं लग्न चर्चेत होतं. तेव्हा असं म्हटलं जातं होतं की आयशा सिद्दिकीला घटस्फोट न देता तो दुसरं लग्न करण्याचा विचार करत होता. तेव्हा आयशा सिद्दिकीनं सगळ्यांसमोर येऊन ती शोएबची पहिली पत्नी आहे आणि तिला घटस्फोट दिल्याशिवाय तो दुसरं लग्न करतोय. 

हेही वाचा : शोएब मलिक आणि सानियाचा घटस्फोट का झाला? अखेर कारण आलं समोर

शोएबनं आयशासोबत कोणतंही नातं असण्यावर नकार दिला होता. मात्र, जेव्हा हे प्रकरण वाढलं तेव्हा त्यानं तिला घटस्फोट दिला. आयशानं सांगितलं की ती लठ्ठ आहे त्यामुळे शोएबला ती आवडत नाही. दरम्यान, शोएबनं 2002 मध्ये आयशानं लग्न केलं. तर शोएब नकार देत असल्यानं त्यानं तिनं तिच्या लग्नाच्या व्हिडीओतील एक क्लिप देखील शेअर केल्याचे म्हटले जाते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?

Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, …

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून …