सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात मिळाले 45 किमीच्या रिंग रोडचे गिफ्ट

Solapur Ring Road: सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती. एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. 

2024 या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना हे नवं गिफ्ट मिळालं आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा 45 किलोमीटरच्या रिंग रूटची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूरच्या हद्दीतील एकूण 5 विभाग शहराशी सहजपणे जोडण्यासाठी या रिंगरोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडचे काम ओजोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. 

या कंपनीने कमी वेळेत उत्तमरित्या केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. या रिंग रोडमुळे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मधील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतमालाच्या वाहतुकीसह दळणवळणाचे साधन ग्रामीण भागात जलद गतीने पोहोचण्यासही मोठा उपयोग होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डी अशी अनेक गावे सोलापूर शहराशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. 

हेही वाचा :  गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...

सुमारे 45 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम गेल्या वर्षी 20 मे 2023 रोजी कंपनीला देण्यात आले होते. ते काम 9 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग सुरू करून नवीन वर्षाचं गिफ्ट लोकांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती ओजोनलँड कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह म्हणाले. या प्रकल्पामध्ये 2-लेन/4-लेन महामार्ग तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि पुनर्वसन, सध्याच्या महामार्गालगत चांगले फूटपाथ बांधणे इत्यादींचा समावेश आहे. 

या नव्याने विकसित झालेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे लोकांची हालचाल सुधारेल. तसेच कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी चांगल्या वाहतूक व्यवस्थेद्वारे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करेल. याशिवाय या चांगल्या रस्त्यांचे जाळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यास मदत करेल असंही ओजोनलँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2024 मध्ये  सोलापूरकरांना मिळालेल्या या गिफ्टमुळे सोलापूरकर देखील आनंद व्यक्त करत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10वी नंतर तुमच्यासमोर ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्याय, नोकरी मिळण्याच्या संधी अधिक

Vocational Courses After 10th: दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थी करिअरच्या विविध मार्ग शोधायला लागतात. बहुतांश विद्यार्थी …

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले… पाहा नेमकं काय घडलं?

Google Maps Accident : देशात कुठेही प्रवास करायचा म्हटले की, सर्वात आधी गुगल मॅप ची …