राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तसेच हा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी रोजी देशात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज आहे.

या भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही हा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशभरात 50 हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय अपेक्षित आहे. अतिरिक्त व्यवसाय अपेक्षित असल्याने व्यावसायिकांनी आधीच तयारी केली आहे.

22 जानेवारी रोजी श्री राम मंदिराच्या उद्घाटनामुळे देशात 50,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज ट्रेड बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने गुरुवारी व्यक्त केला. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी हा आकडा सांगितला आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक दृष्टीने ऐतिहासिक असेल, कारण देशभरातील सर्व वर्गातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष आहे ज्यामुळे लोक श्री राम मंदिराशी संबंधित उत्पादने खरेदी करतील, असे प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं आहे. या अतिरिक्त व्यापाराची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांनी मोठी तयारी केली आहे, असेही खंडेलवाल म्हणाले.

हेही वाचा :  Shani Dev : ३ दशकांनंतर शनिदेव बदलणार आहेत राशी, या तीन राशींच्या व्यक्तींचं दुःख दूर होणार | shani dev after 3 decades is going to change the zodiac these three zodiac signs are going to disappear prp 93

“विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून देशभरात श्री राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 1 जानेवारीपासून राबविण्याची घोषणा करण्यात आलेली मोहीम आणि देशभरातील लोकांमध्ये जो उत्साह पाहायला मिळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील सर्व राज्ये दिसत आहेत आणि जानेवारी महिन्यात 50 हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय होईल असा अंदाज आहे,” असे प्रवीण खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.

कोणत्या गोष्टींना मागणी?

देशातील सर्व बाजारपेठांमध्ये भगवान रामाशी संबंधित वस्तूंना प्रचंड मागणी आहे. यामध्ये श्री राम ध्वज, श्री राम अंगवस्त्र आणि श्री रामाचा फोटो असलेला हार, लॉकेट, चावी, राम दरबाराचे चित्र, राम मंदिराच्या मॉडेलचे फोटो, सजावटीचे पेंडेंट आणि बांगड्या यासह अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय श्री राम मंदिराच्या मॉडेललाही मोठी मागणी आहे. हे मॉडेल हार्डबोर्ड, पाइनवुड आणि लाकडापासून वेगवेगळ्या आकारात बनवले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महिला आणि स्थानिक कारागिरांना रोजगार मिळला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …