Russia Ukraine War: खनिज तेलाचा दर शंभरी पार, सात वर्षातला उच्चांक; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार?


रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता. आता तीच भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या ७ वर्षांतला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता १०६ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे. भारतात आधीच निवडणुकांनंतर रोखून धरलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती अजून वाढण्याची शक्यता असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.

एकीकडे अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती १०६.७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या असताना आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. या किमती १०७.५७ डॉलर प्रतिबॅरल इतक्या वाढल्या आहेत. याआधी थेट जुलै २०१४मध्ये या किमती इतक्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं होतं.

गेल्या आठवड्यात २४ फेब्रुवारी रोजी जेव्हा रशियानं युक्रेनवर पहिला हल्ला केला होता, तेव्हाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या. आधीच कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये परिस्थिती क्लिष्ट झालेली असताना आता कच्च्या तेलाच्या पुरवठादारांमध्ये महत्त्वाचा देश असणारा रशियाच युद्धात उतरल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणार हे गृहीत धरूनच या किमती वाढल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :  सामूहिक विवाहसोहळ्यात तरुणीचं भावोजीसह लावून दिलं लग्न; विवाह होताच तिने कुंकू पुसलं अन्...

The post Russia Ukraine War: खनिज तेलाचा दर शंभरी पार, सात वर्षातला उच्चांक; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार? appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही …

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …