माहिती लपवल्यावरून उच्च न्यायालयाने सचिन वाझेंना फटकारले


मुंबई : माजी न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल आयोगाच्या दोन आदेशांना आव्हान देणारी याचिका करताना त्यात संपूर्ण माहिती न दिल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना फटकारले. तसेच तुम्ही ही याचिका मागे घेणार की आम्ही ती फेटाळून लावू, असे बजावून याप्रकरणी बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने वाझे यांना दिले.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी वाझे सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे चांदिवाल आयोगाच्या आदेशांना आव्हान देणारी याचिका ते मागे घेणार की नाहीत याबाबतचा निर्णय बुधवारी दुपापर्यंत सांगण्याचे आदेश न्यायालयाने वाझे यांच्या वकिलांना दिले.

चांदिवाल आयोगाने २४ जानेवारी आणि ९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशांच्या वैधतेला वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले आहे. तसेच ते रद्द करण्याची मागणी केली आहे. वाझे यांनी २१ जानेवारीला चांदिवाल आयोगाकडे अर्ज करून तत्कालीन सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मििलद भारंबे यांना आयोगासमोर तपासणीसाठी बोलावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी पत्र लिहून नंतर २५ मार्च २०२१ रोजी अहवाल तयार केला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारंबे यांच्या अहवालासह या गोपनीय पत्राची प्रत ३० मार्च २०२१ रोजी आयोगासमोर सादर केली होती. त्यानंतर भारंबे यांचा अहवाल आपल्या हिताविरोधी असल्याचा दावा करत वाझे यांनी भारंबे यांना आयोगासमोर बोलावण्याची मागणी केली होती. आयोगाने मात्र त्यांची मागणी फेटाळली होती.

हेही वाचा :  “संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

The post माहिती लपवल्यावरून उच्च न्यायालयाने सचिन वाझेंना फटकारले appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …