सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही – चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षण हा राज्यातील एक ज्वलंत विषय बनत चालला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता संपूर्ण मराठा समाज (Maratha Aarkashan) एकवटला आहे. राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवाय आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, हे शांततेत होणारं आंदोलन सरकारला पेलणारं नाही असा इशारा जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिला.

अशातच राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी मराठा समाज आरक्षणाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.

पुण्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. त्यावर जरांगेंनी यावं,  बसावं आणि कायद्याची बाजू समजून घ्यावी असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. काल राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आरक्षण टीकणारं हवंय की दिलेलं हवं, अभ्यासकांनी सुद्धा काही इनपुट देऊन सरकारला मदत केली पाहिजे, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी मनोज जरांगेंना केलं आहे. 

हेही वाचा :  अपघाताचा बनाव रचून हडपलेला ४० लाखांचा विदेशी दारूचा साठा हस्तगत

4 हजार मराठा तरुणांना रोजगार 

मराठा समाजातील  4 हजार तरुणांना आरक्षण देऊन त्यांना नोकरी सुद्धा सरकारने दिली आहे. याशिवाय आरक्षण दिल्यानंतरही सरकार आपलं दुश्मन आहे अशा भूमिकेत काम करण्याचा काही कारण नाही असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी जरांगे यांना दिला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आत्ता तुम्हाला हे राजकीय आरक्षण देता येईल पण गायकवाड कमिशनने अभ्यास करून दिलेलं नाही त्यामुळे टिकणारं आरक्षण देण्याचं प्रयत्न सरकारचा आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया 

“मी असं म्हणेण की सरकार प्रामुख्याने 24 तारखेच्या आधी काय करतयं हे पाहणं  महत्वाचं ठरणारं आहे. मराठा समाजाला कुणबीतून (OBC)आरक्षण देताना ते टिकणारं असलं पाहिजे त्यामुळे इतर समाजांवर अन्याय होता कामा नये याचा विचार देखील केला पाहिजे. हे सरकार प्रामाणिक आहे ते काही थातूर-मातूर काही करणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा,” असे चंद्रकांत पाटलांनी म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …