16650 कोटींची कंपनी 75 रुपयांना विकली! एका Tweet मुळे रातोरात कंगाल झाला भारतीय उद्योजक

Rs 16000 Crore Company Sold For Rs 74:  हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेला एखादा श्रीमंत व्यक्ती एका रात्रीत रस्त्यावर आला असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच हे असं घडणं शक्यच नाही असं वाटू शकतं. किंवा या असल्या गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही असंही अनेकजण म्हणतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे आणि तो सुद्धा भारतीय उद्योजकाबरोबर.

कोण आहे हा उद्योजक?

या दुर्देवी उद्योजकाचं नाव आहे बी. आर. शेट्टी म्हणजेच बवागुत्थु रघुराम शेट्टी. शेट्टी यांची एकूण संपत्ती 18 हजार कोटी रुपये इतकी होती. जगप्रसिद्ध असा बुर्ज खलीफा इमारतीमधील 2 संपूर्ण मजले त्यांच्या मालकीचे होते. या मजल्यांची किंमत 2.5 कोटी डॉलर्स इतकी होती. खासगी जेट विमान, लक्झरी कार आणि पाम जुमैरा या बेटासारख्या कृत्रीम भूभागावरील पामा जुमैरा येथे बंगला अशी त्यांची संपत्ती होती. मात्र एका ट्वीटमुळे त्यांच्या या सगळ्या संपत्तीची राख झाली.

हेही वाचा :  मराठ्यांनो हातघाईला येऊ नका; गिरीश महाजनांच्या विधानानं नवा वाद

16 हजार 650 कोटी रुपयांची कंपनी 74 रुपयांना विकली

ज्या पद्धतीने हिंडनबर्ग प्रकरणाचा अदानी समुहाला फटका बसला त्याहून मोठा फटका बीआर शेट्टी यांना बसला आहे. त्यांना आपली 2 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 16 हजार 650 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 1 डॉलरला म्हणजेच 74 रुपयांना विकावी लागली. 

आलिशान घरं, बुर्ज खलिफामधील 2 मजले, खासगी जेट अन्…

बीआर शेट्टी यांच्याकडे जगातील सर्वात प्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीमधील 2 मजल्यांची मालकी होती. या ठिकाणी आलिशान पार्ट्यांचं आयोजन केलं जायचं. ते खासगी जेटने दुबईला ये-जा करायचे. त्यांच्याकडे रॉल्स रॉयस, मेबॅक सारख्या आलिशान गाड्या होत्या. त्यांना व्हिंजेट कार्सचीही फार आवड होती. त्यांच्या कार्सच्या ताफ्यामध्ये मॉरिस माइनर 1000 चाही समावेस होता. शेट्टींकडे पाम जुमैरा आणि दुबई वर्ल्ड सेंटरमधील एक प्रॉपर्टीही होती. त्यांच्याकडे एका खासगी जेटची 50 टक्के मालकी होती. त्यांनी ही मालकी 42 लाख डॉलर्सला विकत घेतली होती.

ही सगळी संपत्ती गमावली कशी?

2019 मध्ये युनायटेड किंग्डममधील ‘मडी वॉटर्स’ने त्यांच्या कंपनीसंदर्भात एक ट्वीट केलं. यानंतर 4 महिन्यांनी कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये एनएमसी हेल्थ कंपनीमध्ये आर्थिक फेरफार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. कंपनीवरील कर्ज हे दाखवल्या जात असलेल्या कर्जापेक्षा जास्त असून कंपनी त्यांचे आर्थिक व्यवहारही आहेत त्यापेक्षा वाढवून चढवून सांगत असल्याचा दावा करण्यात आला. बी. आर. शेट्टी याच एनएमसी हेल्थचे मालक होते. संयुक्त अरब अमिरातीमधील ही सर्वात मोठी खासगी आरोग्य सेवा पुरवणारी कंपनी होती. ही कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टेड कंपनी होती. शेट्टी यांच्या दुर्देवाने या कंपनीवर ‘मडी वॉटर्स’ची वक्रवृष्टी पडली.

हेही वाचा :  किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

एनएमसी हेल्थने बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिचे शेअर्स गुंतवणूकदार विकू लागले. पाहता पाहता शेट्टी कुटुंबियांच्या संपत्तीमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. ‘मडी वॉटर्स’ ही कंपनी ‘हिंडनबर्ग’प्रमाणे शॉर्ट सेलर कंपनी आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …