मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन जन्माला येत नाहीत एलियन; अशी होते एलियनची निर्मीती

Aliens News : काही दिवसांपूर्वी मेस्किकोच्या संससेदत एलियनचे (Aliens) कथित मृतदेह सादर करण्यात आले. याते व्हिडिओ देखील व्हायरल झाले.  यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मात्र, ही संशोधकांची स्टंटबाजी देखील असल्याचा आरोप झाला.  यानंतर या एलियनच्या कथित मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरु असतानाच आता  एलियनच्या निर्मीतीबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन एलियन जन्माला येत नाहीत असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 

मानवाप्रमाणे जन्माला येत नाहीत एलियन

पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष यांच्या माध्यामातून प्रजजजन प्रक्रिद्वारे मानवाची निर्मीती होते. स्त्रीयांमध्ये गर्भधारमेची क्षमता असते. नऊ महिने गर्भधारणा होवून मानव जन्माला येतो. तर, मानवा प्रमाणे पृथ्वीवरील अनेक सजीव प्राणी देखील अशाच प्रकारे प्रजनन करतात. मात्र, एलियनमध्ये अशा प्रकारे प्रजनन होत नाही अशी धक्कादायक माहिती संशोधनातुन समोर आली आहे.

हेही वाचा :  Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

एलियन तयार होण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्पत्तीपेक्षा वेगळी

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाचे (University of Wisconsin-Madison) खगोलशास्त्रज्ञ बेतुल काकर (Betul Kacar) यांनी याबाबतचे संशोधन करुन एलियनच्या उत्पत्तीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एलियन तयार होण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्पत्तीपेक्षा वेगळी आहे. संशोधक परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. या दरम्यान एलियनच्या निर्मीतीबाबत महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. 

अशी होते एलियन्सची निर्मिती

पृथ्वीवरील जीवसृष्टी सेंद्रिय संयुगांवर (Autocatalysis) अवलंबून आहे. कार्बन व्यतिरिक्त, यामध्ये फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सारख्या घटकांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पर्यायी रासायनिक संरचनेमुळे परकीय जीवांचा जन्म होऊ शकतो. शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून रसायनशास्त्राच्या आधारे परग्रहावरील जीवसृष्टी विकसित होऊ शकते का यावर संशोधन करत आहेत. प्रजनन प्रक्रियेद्वारे नाही तर रासायनिक प्रक्रियांमुळे एलियन्सची निर्मिती म्हणजे जन्म होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एलियन हे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या घटकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असलेल्या घटकांपासून बनलेले आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.  हे वेगळे घटक एलियन्सला त्यांच्या ग्रहावर राहण्यास कशाप्रकारे सक्षम बनवतात आणि ते पृथ्वीवरील वातावरणात जिवंत राहू शकतात का यालर देखील संशोधन सुरु आहे. 

हेही वाचा :  एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

मेक्सिको या संसदेत दाखवण्यात आलेले कथित एलिय कधीकाळी जिवंत असल्याचा डॉक्टरांचा दावा

मेक्सिकोच्या संसदेत दाखवण्यात आलेले मृतदेह एलियन्सचेच कथित मृतदेह असल्याचा दावा तिथल्या डॉक्टरांच्या पथकानं केलाय. गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे मृतदेह दाखवण्यात आले होते. हे मृतदेह 2017 मधये पेरूतल्या प्राचीन नाझका लाईन्सजवळ सापडले होते. यातील एक एलियन कधीकाळी जिवंत असल्याचा दावाही डॉक्टरांनी केलाय. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …