माझ्या भावाच्या हत्येचा तपास कुठे अडकला, आठवड्याला शरीराचा एक भाग कापणार म्हणत एक बोट छाटलं

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी (Jyoti Kalani) यांचे स्वीय सहाय्यक (Personal Assistant) नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. 

भावाने बोट कापलं
नंदकुमार ननावरे (Nandakumar Nanaware) आणि त्याचा पत्नीचा आत्महत्या प्रकरणात पोलिस तपासाला वेग मिळत नसल्याने नंदकुमार यांच्या भावाने स्वतःच बोट छाटून ते गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग कापून पाठवणार असल्याचे सांगत डाव्या हाताचे एक बोट कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : सीबीआयला फरक पडतो का?

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी सापडली
पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता  त्यांच्या पँटच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आहेत. फिर्यादीत व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करीत असल्याचे म्हटले असतानाही रणजितसिंह निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख, कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली आहे.  गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत गुन्हे शाखेला दिला आहे. धनंजय ननावरे हे मागील आठवड्याभरापासून तपास अधिकाऱ्यांची भेट घेत फॉलअप घेत आहेत.

कोण होते नंदकुमार ननावरे
नंदकुमार ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं होतं. आत्महत्येपूर्वी ते कलानी कुटुंबियांचे मंत्रालयातील कामं पाहत होते,पण  त्यांनी पत्नीसह आत्महत्या केल्याने कलानी कुटुंबालाही मोठा धक्का बसला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …