Crorepati in India: कोरोनानंतर भारतात श्रीमंतांची संख्या वाढली, जाणून घ्या किती आहेत करोडपती?

Crorepati in India: भारतात श्रीमंताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदाच्या आयकर रिटर्न फाइलिंग डेटाच्या विश्लेषणातून (ITR Filing Tax Payers List) हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या डेटानुसार भारतात एक कोटीहून अधिक पैसे कमवणाऱ्या करदात्यांच्या (Tax Payer) संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर यात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय. देशातील नागरिकांची कमाई वाढत असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. श्रीमंतांच्या संख्येत झालेली ही वाढ देशाच्या विकासाचा दर वाढण्याचे लक्षण आहेत. आगामी काळात भारतात श्रीमंतांची संख्या दुप्पट होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

करोडपती करदात्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली!
वर्ष 2022-23 वर्षाच्या आयकर रिटर्न  फाइलिं (ITR Filing Data) ग डेटानुसार, ITR फाइल करणाऱ्यांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 2.69 लाख आहे. हा आकडा 2018-19 पेक्षा 49.4 टक्के अधिक आहे. वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांची संख्या 1.93 लाख होती. म्हणजेच गेल्या 4 वर्षांत 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 कोटींहून अधिक आयकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 2019-20 च्या तुलनेत त्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, विशेष म्हणडे 5 लाखांपेक्षा जास्त आयकर भरणाऱ्यांची संख्या फक्त 0.6 टक्क्यांनी वाढली आहे.  2018-19 च्या तुलनेत, 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या टॅक्स स्लॅबमध्ये 1.10 कोटी करदाते आहेत. याचाच अर्थ एक कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. 

हेही वाचा :  Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

करदात्यांच्या संख्येत किरकोळ वाढ
असं असलं तरी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कर भरणाऱ्यांची एकूण संख्या अजूनही खूपच कमी आहे. लोकांनी कर चुकवेगिरी करु नये यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. पण यानंतरही एकूण लोकसंख्येपैकी केवळ 6 टक्के लोक कर भरत असल्याचं आकडेवरुन स्पष्ट झालंय. गेल्या दोन दशकांच्या तुलनेत भारतीयांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. 

2 वर्षात करोडपतींची संख्या दुप्पट
1 कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या गेल्या 2 वर्षांत दुप्पट झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 2.69 लाख लोकांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवले आहे. 2021-22 मध्ये 1,14,446 इतकी संख्या होती .2020-21 मध्ये हीच संख्या 81,653 इतकी होती. 

2022-23 च्या आयकर रिटर्नच्या आकडेवारीनुसार, ज्यामध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे, एकूण 1,69,890 लोकांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवले आहे. . आणि मूल्यांकन वर्ष 2021-22 मध्ये अशा लोकांची संख्या 1,14,446 होती. यात वैयक्तिक, कंपनी आणि फर्मचा समावेश आहे. 

महाराष्ट्र पहिल्या, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर 
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयकर रिटर्न भरलेल्यांची संख्या 7.78 कोटी इतकी होती. 2021-22 वर्षात 7.14 तर 2020-21 मध्ये  7.39 लोकांनी आयटी रिटर्न दाखल केलं आहे. यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे महाराष्ट्रात 1.98 कोटी रिटर्न भरले गेले आहेत. उत्तर प्रदेश 75.72 लाखांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर गुजरातमध्ये 75.62 लाख आणि राजस्थानमध्ये 50.88 लाख लोकांनी रिटर्न भरले आहेत.

हेही वाचा :  अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10वी नंतर तुमच्यासमोर ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्याय, नोकरी मिळण्याच्या संधी अधिक

Vocational Courses After 10th: दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थी करिअरच्या विविध मार्ग शोधायला लागतात. बहुतांश विद्यार्थी …

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले… पाहा नेमकं काय घडलं?

Google Maps Accident : देशात कुठेही प्रवास करायचा म्हटले की, सर्वात आधी गुगल मॅप ची …