PCMC Job: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 80 हजारपर्यंत मिळेल पगार

PCMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी निर्माण झाली असून उमेदवारांना चांगला पगारदेखील मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले असून पदासाठी लागणारी पात्रता, रिक्त जागा, पगार, मुलाखतीचा पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिनीअर रेसिडेंशियल पदाच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
 
तसेच उमेदवारांकडे संबंधित विषयातील डिग्री/एमडी /एमएस / DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतचउमेदवाराकजे एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक आहे. 
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार 250 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना पिंपरी-चिंचवड, पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी कोणती परीक्षा नसेल तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाणार आहे.  27 आणि 28 जुलै 2023 रोजी ही मुलाखत होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना  भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ, पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल) येथे उपस्थित रहावे लागणार आहे.

हेही वाचा :  फ्रीजमध्ये बर्फ तयार होत नाही? जाणून घ्या त्या मागचे कारण

मुंबई पालिकेत नोकरीची संधी 

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी दहावी ते पदवीधर अशा सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरती अंतर्गत एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात ज्युनिअर लायब्रेरियनचे 1, ज्युनिअर डायटेशियनच्या 3, ऑप्टोमेट्रिस्टचे 1 आणि ऑडिओलॉजिस्टची 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळू शकणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज खोली क्र. 15, तळ मजला, रोख विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग येथे पाठवायचे आहेत. 

14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ही चोरी बघून तुम्ही ‘धूम’मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

Dhoom Style Theft: कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणी ना कोणी तरी आपल्याला बघत असतो, …

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …