IND vs SL : मैदानात उतरताच हिटमॅन बनला टी-२० क्रिकेटचा नवा बादशाह! पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागे


तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितनं मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने आज रविवारी (२७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास रचला आहे. धर्मशाला येथील रोहितचा हा १२५वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला. मलिकच्या नावावर १२४ टी-२० सामन्यांची नोंद आहे.

सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीनमध्ये पाकिस्तानचे दोन खेळाडू आहेत. मलिकनंतर त्याचा सहकारी मोहम्मद हाफिज तिसऱ्या क्रमांकावर आहे. हाफिजने ११९ सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा इऑन मॉर्गन आणि बांगलादेशचा महमुदुल्ला यांचा क्रमांक लागतो. मॉर्गनने ११५ तर महमुदुल्लाहने ११३ सामने खेळले आहेत. रोहितनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने ९८ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – ‘‘रोहितशी हात मिळवताना सावधगिरी बाळगा, कारण…”, वाचा असं का म्हणाला मोहम्मद कैफ!

तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक गमावली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इशान किशन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आणि यजुर्वेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. ”१२५व्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करताना चांगले वाटत आहे. मला अजून बरीच वर्षे खेळायचे आहे”, असे रोहितने टॉसदरम्यान म्हटले.

हेही वाचा :  Ravindra Jadeja : सामन्यात विकेट घेताच जाडेजाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, फोटो झाला व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …