आधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्…; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या

Crime News : मध्य प्रदेशातून (MP Crime News) एक खळबळजन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका पुतण्यावर आपल्या काकाची हत्या केल्याचा आरोप आहे. 90 हजार रुपयांच्या कर्जामुळे (Loan) 45 वर्षीय किराणा व्यापारी असलेल्या काकाची पुतण्याचे हत्या केली आहे. पुतण्याने हत्येनंतर काकाच्या मृतदेहाचे तुकडे देखील केले. दोन दिवसांपासून काका गायब असल्याने कुटुंबियांनी पोलिसांत (MP Police) तक्रार दाखल केली होती. तपासात शुक्रवारी काकाच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला.

मृतदेहाचे केले तुकडे

विवेक शर्मा असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून त्याचे आरोपी मोहितसोबत अनेकदा व्यवहार होत असे. हे पैसेच दोघांमध्ये वादाचे कारण बनले आणि विवेक शर्मा यांची निर्घृण हत्या झाला. 90 हजारांच्या कर्जावरून मोहितने विवेक शर्मा यांची हत्या केली. विवेक शर्मा यांच्यावर 90  हजारांचे कर्ज होते. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि विवेक यांची हत्या झाली. मोहितने काकाची हत्या करण्यापूर्वी अमली पदार्थ घालून चहा पाजला होता. त्यानंतर मोहितने विवेक यांची हत्या करुन मृतदेहाचे 6 तुकडे केले. मोहितने मृतदेहाचे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून एका खड्ड्याच्या आत लपवून ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितने विवेर यांचे शीर देखील धडावेगळे केले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :  Pune Crime : मृतदेहासोबत दगड भरले अन् विहिरीत फेकले... बेपत्ता व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

पोलीस तपासादरम्यान गोपीकृष्ण सागर धरणाजवळील खड्ड्यात मोहित यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाजवळ त्यांची मोटारसायकल देखील सापडली होती. तपासादरम्यान विवेकच्या हत्येबाबत पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. त्यानंतर त्यांचा तपास मोहितमवर केंद्रित झाला. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला मोहितने तपास पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता विवेकने गुन्ह्याची कबुली दिली.

हत्येवेळी पुतणीसुद्धा होती घरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक यांनी 12 जुलै रोजी आरोपी मोहितकडून 90 हजार रुपये घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. आरोपी मोहित हा वैद्यकीय अधिकारी आहे. विवेक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने चहामध्ये अमली पदार्थ टाकला त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर मोहितने चाकूने आपल्या काकाच्या शरीराचे सहा तुकडे केले. खुनाच्या वेळी आरोपी मोहितची बहीणही घरात होती. त्यानंतर त्यांनी गोपीकृष्ण सागर धरणाजवळ तीन खड्डे खणले आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे टाकून पुरले. 

तांत्रिक तपासाद्वारे पोलीस मोहित पर्यंत पोहोचले होते. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून विवेकचा मृतदेह ताब्यात घेतला. विवेक यांचा शिरच्छेद केल्याचे पोलिसांना आढळून आले. मृताची अंगठी आणि हातातल्या कड्यावरून विवेक यांच्या नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

हेही वाचा :  वाशी आणि घणसोली स्टेशनवर थरार! मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …