कार ड्रायव्हिंग करता…मात्र, कार वापरताना ‘या’ टिप्स का आहेत महत्त्वाच्या?, जाणून घ्या

Car Driving Tips : आपल्यापैकी अनेकांकडे गाडी किंवा कार असते. मात्र,  गाडी किंवा कार वापरताना काही गोष्टी माहीत असूनही त्याचा ते कधी विचार करत नाहीत. परंतु असे करणे म्हणजे आपल्या प्रवासात विघ्न आणण्यासारखे होईल. तुम्ही घराबाहेर पडताना कार वापरताना या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. कार वापरताना या काही टिप्स फोलो केल्या तर तर तुमचा प्रवास सोपा आणि सुखकर होईल. त्यासाठी तुम्हासाठी या टिप्स महत्त्वाच्या आहेत.

गाडीचे टायर कधी बदलावेत ?

अनेकवेळा काय होते की, आपण गाडीचा वापर करत नसतो. त्यामुळे आपल्याला वाटते गाडीचे टायर चांगले आहेत. मात्र, जरी तुम्ही गाडी वापरली नाहीत. तरीही गाडीचे टायर हे बदलणे आवश्यक असतात. त्याचे कारण की टायरची मुदत असते. त्यामुळे बऱ्यावेळा टायर कमकुवत होतात आणि ते फुटू शकतात. त्यामुळे गाडीचा प्रवासा दरम्यान अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे दर तीन ते चार वर्षांनी टायर बदलण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही दरोज काही ठराविक किलोमीटरचा प्रवास करत असाल तर टायर ट्युबमधील हवेचा दाब कमी जास्त होत असतो. अशावेळी तीन ते चार वर्षांआधीचे टायर हा दाब सहन करु शकत नाहीत.

हेही वाचा :  पुणेकरांनो 'या' मार्गाने प्रवास टाळा, PM मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

सीट बेल्ट आणि एअर बॅग 

कार चालवताना आज सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही लोक सीट बेल्ट लावत नाही. तसेच एअर बॅग असल्यास सीट बेल्ट लावण्याची गरज नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, हा मोठा धोका आहे. सीट बेल्ट लावल्याने तुमच्यावर नियंत्रण राहते. अपघाताच्यावेळी तुम्ही पुढे जाऊन आपटू शकत नाहीत. त्यामुळे एअर बॅग उघडण्यास मदत होते. कोणताही अडथळा येत नाही.

इमर्जन्सी बटण कधी चालू करावे ?

प्रत्येक गाडीत इमर्जन्सी बटण असते. मात्र, ते कधी सुरु करावे याबाबत अनेकांना माहिती नसते. कारमध्ये आपत्कालीन स्थितीत पार्किंग लाईट सुरु करण्यासाठी एक त्रिकोणी बटण असते. याला हझार्ड किंवा इमर्जन्सी बटण ही म्हटले जाते. परंतु या त्रिकोणी बटणाचा वापर केवळ धोक्याची सूचना देण्यासाठी करावा. टायर पंक्चर झाल्यास तसेच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे गाडी थांबवायची असल्याते हे बटण दाबून लाईट सुरु करावी.

गाडी लगेच बंद करावी का?

तुम्ही ज्यावेळी गाडी चालवता त्यावेळी तुमची गाडी गरम झालेली असते. मात्र, तुम्ही एसी लावल्यास कार लवकर थंड होईल, असे समज असेल तर ते चुकीचे आहे. तुम्ही 40 ते 50 किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालवल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण थांबल्यास लगेच इंजिन बंद करु नये. किमान दोन मिनिटे तरी इंजिन सुरु ठेवावे. त्यामुळे कारमधील तापमानामुळे टर्बो चार्जर आणि इतर उपकरणे  सामान्य स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि नंतर कारचं इंजिन बंद करावे.

हेही वाचा :  Video: 160 kmph वेगाने मुंबईला येणाऱ्या कारचा अपघात, दोघे ठार; Insta Live मध्ये घटनाक्रम कैद

असं कधीही करु नका, हा धोका

कोणतेही वाहन चालवताना उतार आहे म्हणून तुम्ही पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याच्या नादात तुम्ही तुमचे नुकसान करुन घ्याल. उतारावर कार बंद करुन न्यूट्रलवर  कधीहो चालवू नये. कारण उतारावर तुम्ही गिअर न्यूट्रल ठेवून कार चालवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही कारवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळेल.

समोर हवेत धुके असताना…

तुम्ही कार चालवताना अनेकदा धुक्याचा सामना करता. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो. अशा थंड वातारणात धुक्याची समस्या नेहमी भेडसावते. अशा वेळी कारच्या आतील तापमान आणि बाहेरील तापमान यातील फरकामुळे खिडकीच्या समोरील आणि मागील काचेवर तसेच बाजूच्या आरशांवर धुकटपणा दिसतो. अशावेळी गाडीतील एसी सुरु केला पाहिजे. जेणे करुन आतील आणि बाहेरील तापमानात बदल होईल. त्यानंतर काचेवर धुके दिसणार नाही.

 कार पार्क करताना…

तुम्ही कोठे गेलात तर कार पार्क करतात. त्यानंतर तुम्ही कारमध्ये बसण्यास आला असताना कारमधील वातावरण गरम असते. अशावेळी कारमधील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं, असे जर तुम्हाला प्रश्न असेल तर अशा वेळी कार पार्किंग करुन सोडण्यापूर्वी ‘क्रॉस खिडक्या’ काहीशा उघड्या ठेवल्या पाहिजेत. तसेच कार सुरु करण्यापूर्वी सगळ्या खिडक्या खाली करुन किमान अर्धा-एक किलोमीटर तशीच गाडी चालवावी. असे केल्याने आतील उष्णता लवकर बाहेर पडते.

हेही वाचा :  घाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर...; पाहा Video

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख’, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, ‘निवडणूक पूर्ण होऊन..’

Devendra Fadnavis Riot Planning Allegations: सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री …

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं …