WhatsApp चे फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणार नाहीत, ‘ही’ खास ट्रिक वापरावी लागेल

नवी दिल्ली : WhatsApp Chat Feature : सद्यस्थितीला जर कोणतं मेसेजिंग ॲप सर्वाधिक प्रमाणात वापरलं जात असेल तर ते आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप वर आता आपण फक्त मेसेजच पाठवत नसून फोटो, व्हिडीओ महत्त्वाची डॉक्यूमेंट्सही पाठवतो. पण अनेकदा काही फोटो असे असतात जे आपल्याला आपोआप डाऊनलोड होऊन गॅलरीत येऊ नयेत असं आपल्याला वाटत. पण जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर ऑटो-डाऊनलोड हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला व्हॉट्सॲपवर जे देखील फोटोज किंवा व्हिडीओज येतात ते आपोआप डाऊनलोड होतात. त्यामुळे आपल्याला नको असलेले फोटोज आणि व्हिडीओजही थेट आपल्या गॅलरीमध्ये जातात. अनेकदा एखादा खाजगी फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीत नको जावे असं आपल्याला वाटतं, तर यासाठी काय करु शकता, ते जाणून घेऊ

फॉलो करा सोपी ट्रिक

जर तुम्हाला एखाद्या ग्रुप किंवा चॅटमधील फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीमध्ये जाऊ नये असं वाटतं तर तुम्हाला त्या स्पेसफिक ग्रुप किंवा चॅटमध्ये जाऊन Visibility बदलावी लागेल. हे करण्याकरता तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यात सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा. त्यानंतर मेन स्क्रिनवर सर्वात वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन Chats ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर चॅट्समधील सेटिंग्समध्ये Media Visibility हा ऑप्शन दिसेल. त्याला डिसेबल करावं लागेल. ज्यानंतर फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणं बंद होईल.

हेही वाचा :  WhatsApp चं नवं फीचर, आता व्हॉटसॲपवर मिसकॉल आल्यावर क्षणात करू शकता कॉलबॅक, काय आहे Call Back फीचर?


लवकरच व्हॉट्सॲपवर येणार खास फीचर
व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचं एक दमदार फीचर येत्या काळात व्हॉट्सॲप आणणार आहे. कंपनीने अलीकडेच बीटा चाचणीसाठी व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगचे हे खास फीचर जारी केलं. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल करताना कॉलवरील इतर सहभागी असणाऱ्यांना त्यांच्या स्क्रीनला शेअर करण्याची म्हणजेच त्यांच्या फोनची स्क्रिन दाखवण्याची सुविधा मिळेल. असं फीचर आतातरी झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या ॲप्सवर आहे. जे ऑफिस युजसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

वाचा : भारीच! उन्हात गेल्यावर या फोनचा कलर आपोआप बदलणार, १६ जीबीचा तगडा रॅम, ८७९९ रुपये किंमत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …