Do know You: मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

General knowledge: मॉलमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत. पगार झाला की अनेकांची पहिली पसंती असते ती शॉपिंग. अनेकजण शॉपिंग करण्यासाठी मॉलचा पर्याय निवडतात. घरात वापरात येणाऱ्या साबणापासून ते लाखोंच्या मोबाईलपर्यंत मॉलमध्ये (Malls) मिळतात. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तिथलं टॉयलेट वापरता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? टॉयलेटचे दरवाजे (Toilet doors) जमिनीपासून सामान्य टॉयलेटपेक्षा उंचीवर असतात. असं का असतं? अनेक मोठ्या ऑफिसमध्ये देखील टॉयलेटच्या दरवाजांची उंची ही सामान्य टॉयलेटच्या उंचीपेक्षा अधिक असते. यामागे नेमकं लॉजिक काय आहे? 

काय आहे कारण?

पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयामुळे गुदमरल्यासारखं जाणवतं. त्यामुळे अनेकांना नर्व्हसनेस जाणवतो. उंच दरवाजांमुळे स्वच्छतागृहात दुर्गंधी राहत नाही आणि हवेचं वेंटिलेशनही चांगलं राहतं. त्यामुळे अशा ठिकाणी नकारात्मक परिणाम होत नाही.

साफसफाई

मॉल्स आणि ऑफिसमध्ये बनवलेले दरवाजे जमिनीपासून उंचीवर असतात. त्याचं कारण म्हणजे साफसफाई. दरवाजे उंचीवर असल्याने साफसफाई करणं सोपं जातं. मॉल्स किंवा ऑफिस अशा ठिकाणी वारंवार करावी लागते, अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना जमीन पुसण्यात कमी त्रास होतो. उंच दरवाजांमुळे फरशीचा ओलावा किंवा दरवाजा खराब होत नाही.

हेही वाचा :  Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

आपत्कालीन परिस्थिती

मॉल्स किंवा ऑफिसमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तसेच अनेकदा शौचालयात आपत्कालीन परिस्थिती घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिगर्दीच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली असते. यातून एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर देखील काढलं जाऊ शकतं.

लहान मुलं

टॉयलेटचे दरवाजे उंच असण्यामागे लहान मुलेही एक कारण आहेत. शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने मुले आत अडकून पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उंच दरवाजे असल्यामुळे ते सहज काढता येऊ शकतं.

आणखी वाचा – ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील

दरम्यान, इंटेरियर डिझायनिंगच्या अभ्यासानुसार, असे टॉयलेट अधिक पाहण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी असतात. मात्र, घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये अशा प्रकारचे टॉयलेट्सचे डिझाईन्स फार क्वचित पहायला मिळतील. येत्या काळात अशा प्रकारचे डिझाईन्स अनेक ठिकाणी दिसू शकतात, हे मात्र नक्की.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …