बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई? अमित शाहांच्या बंगल्यावर रात्री 11 वाजता कुस्तीपटूंबरोबर बैठक

Protesting Wrestlers Meet Amit Shah: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या (wrestlers protest) एका टीमने शनिवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला यासंदर्भातील माहिती ऑलिम्पिकपटू बजरंग पुनियाने दिली आहे. अमित शाह या आंदोलनकर्त्या कुस्तीपटू शाह यांच्या दिल्लीतील घरी भेटले. शनिवारी रात्री 11 वाजता ही भेट झाली. जवळजवळ तासभर शाह कुस्तीपटूंबरोबर चर्चा करत होते. या बैठकीला बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगिता फोगट, सत्यवर्त कदियन हे कुस्तीपटू उपस्थित होते.

काय मागणी केली कुस्तीपटूंनी?

शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी कोणताही भेदभाव न करता या प्रकरणाची चौकशी करुन बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. बृवजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक प्रकरणांमध्ये लैंगिक छेडछाड केल्याचे आरोप करण्यात आले असून एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत. आरोप करणाऱ्यांमध्ये काही अल्पवयीन कुस्तीपटूंचाही समावेश आहे. 

हेही वाचा :  सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह यांनी सोडलं मौन, म्हणाले "मग..."

शाह काय म्हणाले?

या बैठकीदरम्यान अमित शाह यांनी कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचं कुस्तीपटूंना सांगितलं. “कायदा त्याचं काम करेल. त्यासाठी आवश्यक असललेला वेळ द्या,” असं शाह यांनी कुस्तीपटूंना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम शनिवारी संपला. याच दिवशी कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक घेतली. 

गंगेत सोडणार होते पदकं

कुस्तीपटूंनी यापूर्वी आमच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला होता. मागील महिन्यामध्ये कुस्तीपटूंनी कारवाई झाली नाही तर आपण जिंकलेली पदकं गंगेत सोडू असंही कुस्तीपटूंनी सांगितलं होतं. मात्र हरिद्वार येथे पदकं विसर्जित करण्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूंना शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी रोखलं.

दिल्ली पोलिसांची कारवाई

दिल्ली पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटू कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत असल्याचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर 28 मे रोजी जंतर मंतरवरुन नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने कुस्तीपटू रॅली काढणार असल्याचं सांगून पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं होतं. या कारवाईनंतर जंतर मंतवरील आंदोलन संपुष्टात आलं आहे.

दोन एफआयआर अनेक आरोप

दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 2 एफआयआर दाखल केल्या आहेत. यामध्ये 6 कुस्तीपटूंबरोबर एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीचा समावेश आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याच्या एकूण 15 तक्रारी नोंदवण्यात आल्यात. यापैकी 10 प्रकरणांमध्ये महिला कुस्तीपटूंना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, त्यांच्या स्तनांवर, बेंबीला हात लावणे याचबरोबर धमकावण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा :  'अमित शाह यांचा मुलगा काय...,' घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण …

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे …