Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा

World Temprature Will Increase In Nect 5 Years : ग्लोबल वॉर्मिंग, अर्थात जागतिक तापमान वाढ आणि तत्सम व्याख्या आपण शालेय अभ्यासक्रमांमध्ये शिकलो. त्याबाबत गांभीर्यानं विचारही केला, पण आमच्या एकट्याच्या प्रयत्नानं काय होणार? असा केविलवाणा प्रश्न विचारत अनेकांनीच या विषयाला बगल दिली. आता मात्र मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणारे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीचं सावट पाहता पुन्हा एकदा जगाचं भवितव्य काय? हाच चिंताजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे. बरं, याचं उत्तर आता थेट जागतिक स्तरावरील संघटनांनीच दिल्यामुळं येणारा काळ किती विदारक असेल याची कल्पना येत आहे. 

नुकताच संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवमान संघटनेच्या वतीनं Greenhouse gases आणि अल निनोचा परिणाम जागतिक तापमान वाढीवर होणार असल्याचा सतर्कतेचा इशारा दिला. पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2023 ते 2027 दरम्यानच्या काळात भीषण उकाडा जाणवेल असा इशाराच दिल्यामुळं आता संपूर्ण जगाचंच भवितव्य उष्णतेच्या झळा सोसणार हे स्पष्ट होत आहे. 

संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार 2015 ते 2022 ही आतापर्यंतची सर्वाच उष्ण वर्ष गणली गेली होती. पण, जलवायू परिवर्तनामुळं वातावरणात सातत्यानं मोठे बदल झाले आणि तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं वाढू लागला. परिणामी पुढच्या 5 वर्षांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद केली जाऊ शकते असा इशारा WMO नं दिला. 

हेही वाचा :  पुढील 48 तासांसाठी राज्याच्या 'या' भागांत 'मौसम मस्ताना'; पाहा कुठे बरसणार पाऊसधारा

अल निनो आणि त्याचे परिणाम 

फक्त भारतातच नव्हे, तर सध्या जगातील इतरही देश वाढत्या तापमानानं हैराण आहेत. यामध्ये अल निनोचा प्रभावहीमोठी भूमिका बजावत असल्याचं मत हवामानत तज्ज्ञ मांडतात. 

 

‘अल निनो’ हा सागरी प्रवाह असून त्याचा मान्सूनवर परिणाम होतो. पेरुसह चिली देशाच्या किनारपट्टीवर या परिणामांची तीव्रता अधिक असते. हा पाण्याखालील प्रवाह विषुववृत्तावरून पाण्यावर आल्यास पृथ्वीवरील हवामानावर याचे परिणाम होतात. 

WMO मागोमाग अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था (NASA)कडूनही अतिशय गंभीर स्वरुपातील निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. नासाकडून सेंटिनेल-6 मायकेल फ्रिलिश या उपग्रहातून पृथ्वीवर वाहणाऱ्या उष्णतेच्या लाटांचं वास्तव समोर आणलं केलं. याच लाटा पुढे जाऊन अन निनोमध्ये प्रभावित होत असून सध्या त्या पॅसिफिक महासागरातून भारताच्या दिशेनं सरकताना दिस आहेत. समुद्रात उसळणाऱ्या या उष्णतेच्या लाटांची उंची कमाल 4 इंच असली तरीही त्यांची रुंदी मात्र प्रचंड असल्याचं म्हटलं जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …

‘पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न’

Pune Accident Case : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे …