तुमच्या इअरबड्समध्ये मळ अडकलाय? साफ करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नवी दिल्ली :How to Clean Earbuds : बदलत्या डिजीटल युगात नवनवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असताना नवनवीन प्रोडक्ट्स देखील लाँच होत आहेत. आधी वायर असणारे इअरफोन्स होते मग ब्लूटूथ इअरफोन्स येऊ लागले त्यालाही दोन इअरबड्सना जोडणारी वायर असायची, पण आता थेट इअरबड्स मार्केटमध्ये येत असून दोन्ही दोन कानात आपण घालू शकतो.

काही काळापूर्वी याच इअरबड्सची किंमत खूप जास्त असायची. पण आता तुम्हाला अगदी हजार रुपयांमध्ये चांगले इअरबड्स मिळतील. पण कानात मळ आणि आजूबाजूची धूळ अडकल्याने इअरबड लवकर खराब होतात, त्यामुळे आवाजही नीट येत नाही. हे इअरबड्स साफ करणंही खूप अवघड आहे, कारण स्पीकर्सची जाळी तुटण्याची भीती आहे. पण काही टिप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या इअरबड्स स्वच्छ करू शकता.

अशा प्रकारे बाहेरुन स्वच्छ करा
तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरून TWS इअरबड्स हलक्या हाताने साफ करू शकता. तुम्ही ते एकावेळी एक इअरबड स्वच्छ केले पाहिजे आणि नंतर त्याच प्रकारे चार्जिंग केस स्वच्छ करा. यानंतर, तुम्ही इअरबड्स घासण्यासाठी मऊ ब्रश वापरू शकता. अशाप्रकारे तुम्ही इअरबड सुरक्षितपणे स्वच्छ करु शकता आणि सर्व घाण काढून टाकू शकता.

हेही वाचा :  Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

कापूस वापरा
इअरबड्सची आतील बाजू स्वच्छ करण्यासाठी कापूस वापरणं जास्त फायद्याचं आहे. कापूस वापरताना साफ करण्यासाठी अल्कोहोल थोडक्यात काय तर सॅनिटायजर वापरु शकता. स्वच्छ करताना आपल्याला कापसावर थोडासा दाब लावावा लागेल आणि हळूवारपणे पुसून टाकावे लागेल. याव्यतिरिक्त, ज्याठिकाणी आवाज येण्यासाठी होल असतो, ती बाजू नीट आतून साफ करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा ब्रश वापरता येईल. तसंच किंचित ओलसर कापडाने तुम्ही पुसूही शकता.

इअरटिप्स काढा आणि स्वच्छ करा

इअरबड्समधील बहुतेक घाण ही इअरटिप्समध्ये असते. त्यामुळे त्या इअरटिप्स बाहेर काढून त्याला कापडाने आणि सॅनिटायझरने पूर्णपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे.

वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …