Shocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : साप पाहिला तरी अनेकांची बोबडी वळते. भांभेरी भरते… काय करावे हे सुचतच नाही. मात्र, एका घरात चार पाच नाही तर सापाची तब्बल 39 पिल्ले (snake cubs) सापडली आहेत. गोंदियात (Gondia) ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तातडीने सर्पमित्राना पाचारण करण्यात आले (Shocking News). 

राजेश शर्मा यांच्या घरी ही सापाची पिल्ले आढळली आहेत. गोंदिया शहरातील शास्त्री वार्ड येथे राजेश शर्मा यांचे घर आहे. शर्मा यांचे घर  जवळपास 20 वर्ष जुनं आहे. त्यामुळे घराच्या लाकडी दरवाज्याच्या फ्रेम मध्ये वाळवी लागली होती. त्यामुळे शर्मा यांनी वाळवी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी सोर जे काही दिसले ते पाहून त्यांचा थरकाप उडाला.

वाळवी काढत असताना त्यांना दरवाजाच्या फ्रेममध्ये  काळ्या रंगाची वस्तू दिसून आली. आणखी खोदकाम केल्यावर ही सापाची पिल्ले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शर्मा यांनी तात्काळ याची माहिती सर्प मित्राला दिली. सर्प मित्र घटनास्थळी पोहचत एका पाठोपाठ एक असे 39 सापाचे पिल्ले बाहेर काढली. हे साप पाहून नागरीकांना धक्काच बसला. शेवटी सर्व सापाच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवास सोडण्यात आले आहे.

हेही वाचा :  वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

कल्याणमध्ये आढळला  ब्लॅक कोब्रा

मध्य प्रदेश, हरियाणा राज्यांत आढळणारा ब्लॅक कोब्रा जातीचा नाग कल्याणमधील एका घरात आढळला होता. वडवली भागात राहणारे दुर्गेश झा यांच्या घरात हा ब्लॅक कोब्रा दिसताच सगळ्यांची भंबेरी उडाली. सर्प मित्राने या कोब्राला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. 

मालेगावमध्येही संवदगाव शिवारात ब्लॅक कोब्रा आढळून आला होता. सर्पमित्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या नागाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. वनविभागात नोंद केल्यानंतर त्याला अधिवासात सोडण्यात आले. 

जखमी नागिणीला जीवदान 

नाशिकच्या मालेगावमध्ये सर्पमित्रांनी एका जखमी नागिणीला जीवदान दिले होते. या नागिणीच्या पोटाला जखम झाली होती. तिच्यावर यशस्वी उपचार करून तिला नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …