Gold Price : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! आजच खरेदी करा सोने, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate on 4 April 2023 : सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोने-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरातही आज घसरण झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हीच सूर्वणसंधी आहे.  दरम्यान सोने आणि चांदीच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी चढ-उतार पाहायला मिळते आणि चालू आठवड्यात सोन्यावर खरेदीदार आणि गुंतवणूकदार खरेदीसाठी तुटून पडले. आणि आज पुन्हा एकदा खरेदीदारांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. 

आज, मंगळवारी गुड रिटर्न्स किंवा वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 59,670 रुपये आणि आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 740 रुपये आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,670 प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम पुण्यचा दर 54,700 एसेल आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,730 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,700 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम चांदीचा आजचा दर 740 रुपये आहे.  

हेही वाचा :  Gold-Silver Rate Today: सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी महागलं; रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम!

वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, येथे चेक करा नवे दर 

देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

चेन्नई – 60,380 रुपये

दिल्ली -59,820 रुपये

हैदराबाद -59,670 रुपये 

कोलकाता –  59,670 रुपये

लखनौ – 59,820 रुपये

मुंबई – 59,670 रुपये

पुणे – 59,670 रुपये

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नी मारहाण करते, पुरेसं जेवणही देत नाही; माजी मंत्र्याच्या आरोपांमुळे खळबळ; मुलगा म्हणाला ‘त्यांना…’

राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप …

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने …