Gold-Silver Rate Today: आज सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी महागले, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

Gold-Silver Price Today on 25 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चढ-उतारांचा काळ सुरू आहे. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळाली आहे. चला जाणून घेऊया 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्या-चांदीच्या किमती सराफा बाजारात किती रुपयांनी महागले आहेत…

bankbazaar.com नुसार सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल (24 मार्च) 55,730 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाणारे 22 कॅरेट सोने आज 55,930 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाईल. तर 24 कॅरेट सोने 58,520 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते ते आज 58,730 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाईल. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचा: ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले; पाहा तुमच्या शहरातील दर 

हेही वाचा :  Gold Silver Price Today : सोने-चांदीचे दर पुन्हा धडाम, खरेदीपूर्वी पाहा आजचा प्रतितोळा भाव काय?

चांदीच्या ही दरात वाढ

bankbazaar.com मते, चांदीच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. म्हणजेच 75,400 रुपये किलोने विकली जाणारी चांदी आज 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकली जाणार आहे. म्हणजेच आज एकूणच चांदीच्या दरात वाढ झाली आहे.  

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

हेही वाचा :  AdaniEnterprises : अदानी ग्रुपचा शेअर मार्केटमध्ये मोठा झोल! 'त्या' 88 प्रश्नांमुळे अडचणीत वाढ, 489,99,30,00,000 कोटींचा फटका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर

Karnatak Gangwar Video: आधी पांढरी कार मागच्या बाजुने काळ्या कारला ठोकते..त्यानंतर काळ्या कारमधून 3 तरुण …

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …