Raj Thackeray: …याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?

Raj Thackeray Warns Government Over Mahim Construction: शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धक्कादायक व्हिडिओ दाखवला. मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी केला. त्वरीत कारवाई करा, नाहीतर गणपती मंदिर बांधू असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. राज ठाकरे यांची सभा संपल्यांनतर काही क्षणात मुंबई महापालिकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

गुडी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी एक गंभीर व्हिडिओ दाखवत सरकारला आव्हान दिले. मुंबईमध्ये माहीमच्या समुद्रात नवं हाजीअली तयार करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला आहे. समुद्रात अनधिकृतपणे दर्गा बांधला गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला.

राज्यकर्त्यांचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असलं की काय तयार होतं, त्याचा दाखला देत राज ठाकरेंनी हा व्हिडिओ दाखवला. त्याचबरोबर महिनाभरात कारवाई झाली नाही तर त्या दर्ग्याच्या बाजूला आम्ही गणपतीचं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यानंतर मुंबई महापालिकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण 

माहीम दर्ग्यामागील समुद्रात केलेलं अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही. मुंबई महापालिकेकडून असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. समुद्राच्या आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून देण्यात आले. यामुळे मुंबई जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत असेही मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा :  "पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम

मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त तसंच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील. मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्राच्या किनाऱ्याच्या आतमध्ये दहा मीटर आत जरी असल्यास मुंबई महापालिकेची हद्द किनाऱ्यापलगतच असल्याने समुद्र जिथे सुरू होतो त्या समुद्राच्या आतील भागात मुंबई महापालिकेची हद्द संपते त्यामुळे या हद्दीमध्ये मुंबई महापालिका कारवाई करू शकत नाही असे सांगण्यात आले. 

माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?

माहीमच्या समुद्रात करण्यात आलेल्या त्या बांधकामाची पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले. लँड रेकॉर्ड पाहून ते बांधकाम कुणाच्या हद्दीत येतं ते पाहणार. ते जिल्हाधिकारी हद्दीत येत असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर कारवाई करणार, असं जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितलं. तर, दुसरीकडं समुद्रातील ते बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही, असं सांगत महापालिकेनं हात वर केल आहेत.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक

Delhi Temperature: देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केरळ (Monsoon in kerala) राज्याला मान्सूनची प्रतीक्षा असतानाच भारतातील मध्य …

Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; ‘इथं’ अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानात मोठे चढ- उतार …