Nanaryan Rane On Ajit Pawar: “अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर…”, राणेंचा थेट इशारा!

Nanaryan Rane On Ajit Pawar : एकीकडे पुण्याची पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election) शिगेला पोहोचली असताना शिवसेना फोडणाऱ्यांचा पराभव झाला, असा निशाणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणे (Nanaryan Rane) यांच्यावर साधला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले Nanaryan Rane ?

दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये मी का तोंड घालावं काही जणांना कायम तोंड घालण्याची सवय असते. त्यांच्या दोघात जे काही बोलणं झालं त्यात मला पडायचं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत. मी काही ज्योतिषी नाही कोणता पक्ष कधी संपणार आहे हे सांगायला. जे पक्ष देशासाठी चांगलं काम करतात ते परत परत निवडून येतात आणि जे करत नाही ते इतिहास जमा होतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांना थेट इशारा 

अजितदादांला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं हे मला माहित नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचं बारसं (नाव ठेवायला) करायला जाऊ नये
अजित पवारांनी माझ्या फद्यात पडू नये नाहीतर पुण्यात जाऊन त्यांचे मी बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी अजित पवार (Nanaryan Rane On Ajit Pawar) यांना दिला आहे.

हेही वाचा :  न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र 

माझं पहिलं कार्यक्षेत्र हे मुंबई मात्र बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मला कोकणात पाठवलं आणि तरीही मी सहा वेळा निवडून आलो. महिला असो किंवा पुरुष उमेदवार असो. ठाकरे गट सगळेच मी केलं म्हणतात. उद्या समुद्र देखील मिच केलं असे उद्धव ठाकरे म्हणतील.

आणखी वाचा – Subhash Desai on Shinde: …तुमची दाढीच जाळून टाकू; CM एकनाथ शिंदेंबद्दल सुभाष देसाईंचं खळबळजनक विधान

दरम्यान, केंद्रानं सही करून नोटीस कधी काढली आणि ते कोणाच्या राजवटीमध्ये काढले हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंने काय केलं हेच कळत नाही उगा काही पण बोलायचं. उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेतील विशेषण देखील योग्य ठिकाणी वापरता येत नाही, असा टोला देखील नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख’, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, ‘निवडणूक पूर्ण होऊन..’

Devendra Fadnavis Riot Planning Allegations: सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री …

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं …