Living Room सजवण्याच्या सोप्या ७ पद्धती, लहान जागाही भासेल मोठी

संपूर्ण कुटुंब सुट्टीच्या दिवशी असो वा संध्याकाळच्या वेळी असो एकत्र बसण्याचे ठिकाण म्हणजे लिव्हिंग रूम. सोफ्यावर पाय ताणून टी. व्ही. बघणं असो वा आडवं पडून एखादं पुस्तक वाचणं असो. लिव्हिंग रूममध्येच या गोष्टी आपण करत असतो. पण अशी ही लिव्हिंग रूम अधिक आरामदायी कशी बनवावी याची ट्रिक तुम्हाला माहीत आहे का? लिव्हिंग रूम मोकळी आणि तरीही अधिक उपयोगी कशी करता येईल याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (फोटो सौजन्य – Freepik.com, Canva)

​पेस्टल कलर्ससह गॅलरी वॉल​

​पेस्टल कलर्ससह गॅलरी वॉल​

आजकाल लिव्हिंग रूमसाठी गॅलरी वॉलची फॅशन आणि ट्रेंड चालू आहे. तसंच घराला पर्सनल टच देण्याचा हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय तुम्ही भिंतींवर प्रेरणात्मक कोट्सच्या फ्रेम्सचा वापर करू शकता अथवा तुमच्या कुटुंबाचे फोटो, आर्ट फोटोचा वापर करावा. मात्र हा ट्रेंड फॉलो करताना मिनिमल फ्रेम्स राहतील याचा विचार करा. लिव्हिंग रूममध्ये पेस्टल रंगाच्या भिंतीवर अशा फ्रेम्स अधिक सुंदर दिसतात.

हेही वाचा :  सौंदर्य स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन् पत्नीला...; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

​मिरर वर्कचा करा उपयोग​

​मिरर वर्कचा करा उपयोग​

तुमची लिव्हिंग रूम लहान असेल तर तुम्ही ही रूम मोठी दर्शविण्यासाठी आरशांचा वापर करू शकता. पण जुन्या आरशांपेक्षा ट्रेंडी आणि लाकडी फ्रेमच्या आरशांचा वापर केल्यास लिव्हिंग रूमला वेगळे रूप देऊ शकता. जर तुम्हाला नवा आरसा नको असेल तर जुन्या आरशालाच नवा रंग देऊन तुम्ही त्याचा वापर करू शकता.

(वाचा -‘स्ट्रगलर साला’ ते स्वतःच्या घराचा प्रवास, कुशल बद्रिकेच्या घराची मराठमोळी सुबक मांडणी)

​स्टोन वॉलने वाढवा शोभा​

​स्टोन वॉलने वाढवा शोभा​

तुम्हाला लिव्हिंग रूमचा तोचतोचपणा नको असेल तर तुम्ही यासाठी स्टोन वॉलचा पर्याय निवडू शकता. तुमची लहान असणारी लिव्हिंग रूम अधिक मोठी दिसू शकते. यामध्ये प्राचीन, ग्रामीण आणि तरीही आधुनिकता यांचा सुंदर मिलाप दिसून येतो. इतकंच नाही तर तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना प्रभावित करण्यासाठीही अशी रचना तुम्ही करून घेऊ शकता.

(वाचा – इंटिरिअरच्या साम्राज्यात का ठरते गौरी खान ‘क्वीन’, होम डेकोरसाठी मिळेल रॉयल लुकची प्रेरणा)

​वेगळ्या पद्धतीने सजवा​

​वेगळ्या पद्धतीने सजवा​

काही जणांना घरात तोचतोचपणा कंटाळवाणा वाटतो. मग त्यासाठी काही वेगळं करायचं असेल तुम्ही टायर्सची सिटींग अरेंजमेंट्स अथवा वेगळ्या पद्धतीची बैठक स्टाईल करून लिव्हिंग रूम अधिक मोठी दाखवू शकता. यासाठी तुम्ही गडद रंगाचाही वापर करू शकता.

हेही वाचा :  चिमूटभर हळदीने गायब होतील चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स, वापरा सोपी पद्धत

(वाचा – आलिशान घर आणि क्लासिक फर्निचर, अशी आहे श्रेया बुगडेच्या घराची सुबक मांडणी)

​सकारात्मकता आणण्यासाठी करा गडद रंगाचा वापर​

​सकारात्मकता आणण्यासाठी करा गडद रंगाचा वापर​

तुम्हाला घरात सकारात्मकतेचा फील हवा असेल तर तुम्ही गडद रंगाचा वापर लिव्हिंग रूमसाठी करा. तसंच लिव्हिंग रूम डेकोरेट करताना संतुलित राहा. अति पसारा होईल अशा वस्तू आणून ठेऊ नका. एखाद्या कोपऱ्यात इनडोअर प्लांट अथवा लाकडी फर्निचरचा वापर करून तुम्ही लुक पूर्ण करू शकता.

​टेक्स्चरचा उपयोग करा​

​टेक्स्चरचा उपयोग करा​

तुम्हाला रंग कोणता निवडावा कळत नसेल तर सध्या टेक्स्चरदेखील ट्रेंडिंगमध्ये आहेत. तुम्ही एखाद्या भिंतीसाठी याचा वापर करू शकता. जिथे सोफा ठेवणार असाल त्याच्या मागच्या भिंतीवर अशा पद्धतीचे टेक्स्चर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. टेक्स्चरनुसार तुमच्या लिव्हिंग रूममधील वस्तू तुम्ही सजवा.

​निऑन लायटिंगचा करा उपयोग​

​निऑन लायटिंगचा करा उपयोग​

तुम्हाला टेक्स्चर नको असेल तर लिव्हिंग रूम सजवताना तुम्ही ठिकठिकाणी निऑन लायटिंगचाही उपयोग करून घेऊ शकता. तुम्ही अधिक पार्टी करणाऱ्या व्यक्ती असाल तर तुमचे लिव्हिंग रूम तुम्ही संध्याकाळच्या वेळी असे बदलू शकता. सकाळच्या वेळात लिव्हिंग रूम वेगळी दिसेल आणि संध्याकाळी वेगळी.

हेही वाचा :  Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

या ७ पद्धतीने तुम्ही तुमची लिव्हिंग रूम सजवून मोठी दाखवू शकता. तसंच या टिप्सचा वापर करून तुम्ही नव्या पद्धतीची लिव्हिंग रूमही तयार करू शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …