Jitendra Awhad : औरंगजेबचा महाल दुरुस्त करा; आव्हाड यांच्या वक्तव्यावरुन वाद पेटला असतानाच राष्ट्रवादीची मागणी

विशाल करोळे, झी मी मीडिया, औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj) केल्याने महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटला आहे. असे असताना औरंगजेबचा महाल (aurangzeb mahal in aurangabad) दुरुस्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आता या मागणीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

जितेंद्र आव्हाड यांचं महापुरुषांबाबत सुरू असलेले वक्तव्याचा वाद ताजा असताना आता संभाजी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने नवा वाद निर्माण केला आहे. संभाजीनगर शहरात औरंगजेबचा जुना महाल आहे. या महलाचं संवर्धन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी संभाजीनगरची ओळख आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून देखील संबाजीनगरला ओळखळं जातं. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशी वेगवेगळी पर्यटनस्थळं संभाजीनगरमध्ये आहेत. मीनी ताजमहल म्हणून ओळखलं जाणारा बीबी का मकबरा हे देखीस संभाजीनगरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळ आहे. या स्थाळांची दुरावस्था झाल्याचे पहायला मिळते. अशातच औरंगजेबचा जुना महाल दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

हेही वाचा :  Golden Temple: 'हा भारत नाही पंजाब आहे...' चेहऱ्यावर तिरंगा पेंट केलेल्या मुलीला सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखलं

G20 अंतर्गत अनेक रिपेरिंगची काम शहरात सुरू आहेत. त्यातच औरंगजेबच्या या महालाची ही दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केलेली आहे. यावरून आता नवा वाद सुरू होण्याची चिन्ह आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने आता आत्म परिक्षण करण्याची गरज आहे त्यांनी केलेल्या मागणीचा निषेध असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांच्या कोणत्या वक्तव्यामुळे वाद झालाय?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेब, अफझलखान आणि शाहिस्तेखानाशी केली आहे.  आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलनांचा भडका उडाला. आव्हाडांनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपनं राज्यभर फटकार मोर्चाची हाक दिली. आव्हाडांचे पुतळे जाळण्यात आले. मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.  या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवरायांच्या शौर्याबाबत भाषण देताना आवेशात बोललो अशी कबुली माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये दिली होती. 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …