मूळ जळगावची असलेली नेत्रहीन प्रांजल बनली IAS अधिकारी ; ही यशोगाथा तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा – देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक. उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या व्यतिरिक्त, चिकाटी आणि संयम कधीही न सोडण्याची वृत्ती यश मिळवून देते. आज आम्ही तुमच्यासाठी दृष्टिहीन विद्यार्थिनी प्रांजल पाटीलची कहाणी घेऊन आलो आहोत, जिने आपल्या सर्व अडचणींवर मात करून भारताची पहिली अंध महिला IAS अधिकारी बनली. त्यांची ही यशोगाथा प्रेरणांनी भरलेली आहे

आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीतून तिने एक-एक अडथळे पार केले. प्रांजल पाटील हीने दोनदा UPSC परीक्षा दिली. एकदा 2016 मध्ये आणि एकदा 2017 मध्ये. 2016 मध्ये त्याची रँक 744 होती, पण दुसऱ्या प्रयत्नात तिने 124 वा रँक मिळवला. मूळ जळगावची असलेली प्रांजल उल्हासनगरला राहते. तिची दृष्टी जन्मतःच अधू होती. वयाच्या सहाव्या वर्षी तिने दृष्टी कायमची गमावली. मात्र समस्यांपुढे गुडघे टेकेल, तर ती प्रांजल पाटील कसली.

मुंबईतील कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाइंडमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. तिने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि नंतर एम.फिल आणि पीएच.डी.

हेही वाचा :  BECIL मार्फत विविध पदांच्या 155 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

विशेष म्हणजे प्रांजलने कधीही आयएएस तयारीसाठी कोचिंग घेतले नाही. पुस्तकांचे मोठ्याने वाचन करणारे खास सॉफ्टवेअर तिने वापरले. तिने आपल्या श्रवण क्षमतेचा फायदा घेऊन तयारी केली. ती अंध असल्याच्या कारणावरून तिला भारतीय रेल्वेकडून नोकरी नाकारण्यात आली होती.

मात्र, रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा मारत असतानाच तिने परीक्षेची तयारी करत लढाई जिंकली. 2017 मध्ये रँक सुधारत ती 124 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. तसेच ग्रंथालयातील पुस्तकांवर अनेक विद्यार्थी मार्किंग करत असल्याने, त्याचे कॉम्प्यूटरवर स्कॅन करताना आवश्यक भाग स्कॅन होत नाहीत. अशावेळी महत्त्वाचाच भाग वगळला जातो. ते बंद व्हावं यासाठी तिने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले.

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …