Honda Activa: नव्या ‘अ‍ॅक्टिवा’मध्ये कारसारखे फिचर्स! Smart-Key, ‘फाइंडर’चाही समावेश

Honda Activa H-smart: ‘होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया’ने (Honda Activa H-smart) अ‍ॅक्टिवाचं नवं व्हेरिएंट बाजारात उतरवलं आहे. होंडाने अ‍ॅक्टिवाच्या अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट (Activa H-smart​) या नव्या व्हेरिएंटची सोमवारी नवी दिल्लीमधील कार्यक्रमात घोषणा केली. अ‍ॅक्टिवाची ही नवी स्कूटर तीन वेगवेगळ्या सब व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या व्हेरिएंटमधील बेसिक बाईकची किंमत ही 74 हजार 536 रुपये इतकी असेल. ही किंमत एक्स शोरुम आणि इतर तीन व्हेरिएंटमध्ये वेगवेगळी असेल. कंपनीने या नव्या स्कूटरमध्ये अनेक भन्नाट फिचर्स दिले आहे. नवी अ‍ॅक्टिवा ऑन बोर्ड डायनोस्टिक्स आणि थ्री ट्रिम्ससहीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने जे नवीन तीन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यामध्ये होंडा अ‍ॅक्टिवा स्मार्ट की (Honda Activa Smart Key), अ‍ॅक्टिवा ड्युलेक्स (Activa Deluxe) आणि अ‍ॅक्टिवा स्टॅडर्स्टसचा (Activa Standard) समावेश आहे.

चावीशिवाय चालणार स्कूटर

कंपनीने जी स्कूटर लॉन्च केली आहे ती स्मार्ट स्कूटर आहे. ही स्कूटर चावीशिवाय चालेल. होंडा अ‍ॅक्टिवा एच-स्मार्ट स्कूटरमध्ये 6G (2023 अ‍ॅक्टिवा 6 जी) तंत्रज्ञानही लॉन्च केलं आहे. हे कीलेस फंक्शन नुकत्याच लॉन्च केलेल्या अ‍ॅक्टिवा एच-स्मार्टमध्ये वापरण्यात आला आहे. पहिल्यांच कंपनीने आपल्या दुचाकीमध्ये एच-स्मार्ट तंत्रज्ञान वापरलं आहे.

हेही वाचा :  महिंद्रा उडवणार Ertiga आणि Innova ची झोप; बाजारात दाखल होतीये 9 सीटर Bolero; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पेटेंट असलेली पाच तंत्रज्ञान वापरण्यात आली

कंपनीने होंडा अ‍ॅक्टिवा एच-स्मार्टमध्ये पाच नवे पेटंट टेक्नोलॉजी अ‍ॅप्लिकेशन देण्यात आल्याचा दावा केला आहे. या स्कूटरला तीन ट्रिम्ससहीत लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये स्मार्ट, ड्युलेक्स आणि स्टॅडर्स्ट असे पर्याय उपलब्ध आहेत. पेटंट असलेल्या कोणत्या गोष्टी वापरण्यात आल्या आहेत याची यादी खालील प्रमाणे…
सिक्युरिटी (Honda Smart Key System)
यूजेबिलिटी (Honda Smart Key System)
रिलायबिलिटी (ACG Starter Controller)
मेंटेन एबिलिटी (Air Cleaner)
ड्राइविलिटी (Fuse Replacement)

फाइंड फीचर

या स्कूटरमध्ये ग्राहकांना नवं स्मार्ट फाइंडर फीचर देण्यात आलं आहे. स्मार्ट की यूजरला स्कूटरला शोधण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला याची मदत होणार आहे. म्हणजेच स्मार्ट कीच्या मदतीने गाडी कुठे आहे हे शोधता येणार आहे. फाइण्ड माय डिव्हाइजप्रमाणेच हे तंत्रज्ञान काम करणार आहे. गाडी कुठे आहे हे शोधण्यासाठीचा हा पर्याय वापरल्यास गाडी रिस्पॉण्ड करेल. स्मार्ट कीच्या माध्यमातून फिजिकल चावीचा वापर न करता स्कूटर लॉक आणि अनलॉक करता येणार आहे.

हेही वाचा :  Tata ने फोडला आणखी एक 'बॉम्ब', 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक...

विशेष म्हणजे गाडीवर जाऊन बसण्याआधी गाडीपासून दोन मीटर अंतरावर असतानाच गाडीचं इंजिन सुरु करता येणार आहे. हे इंजिन स्टार्ट आणि स्टॉप स्विचसहीत येतं. 

तीन व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत किती?

Honda Activa Smart Key – ₹80,537
Activa Deluxe – ₹77,036
Activa Standard – ₹74,536



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच

Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने …

Google I/O 2024 Highlights: जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं ‘हे’ टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन …