Coronavirus China: चीनची अशी ही बनवाबनवी? भयावह परिस्थितीत सरकारने घेतला मोठा निर्णय!

Corona Outbreak In China: चीनमध्ये कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्याच्या बातम्या समोर येत होत्या. चीनच्या काही शहरात भयावह परिस्थिती असल्याचं पहायला मिळत होतं. 2019 पेक्षाही कोरोनाची ही लाट अत्यंत घातक असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवण्यात चीन पूर्णपणे अपयशी ठरलाय. अशातच एका रिपोर्टमुळे चीनच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या रिपोर्टनुसार चीनमध्ये दररोज तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत होती. (China to drop COVID-19 quarantine rule for inbound travellers from Jan 8 marathi news)

चीनमध्ये रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा झाल्याची माहिती चीनमधून (Corona Outbreak In China) समोर येत होती. त्यामुळे भारताचं देखील टेन्शन वाढलं होतं. अशातच आता चीन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीनने (China to drop COVID-19 quarantine rule) प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम रद्द केलाय. त्यामुळे आता चीनचा कोरोनाचं नाटक फक्त एक बनवाबनवी होतं का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

राष्ट्रपती जिनपिंग यांनी कोरोनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. चीन सरकारने बाहेरुन आलेल्या देशांतर्गत प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय रद्द केलाय. येत्या 8 जानेवारीपासून हा नियम (Covid Rules) आमलात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या या नियमाला आता शिथीलता देण्यात आली आहे.

हेही वाचा :  भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी

आणखी वाचा – Corona Guidelines : ‘या’ राज्याने उचललं कठोर पाऊल, शाळा, कॉलेज, हॉटेल, सिनेमागृहात मास्कसक्ती

दरम्यान, वुहानमध्ये परिस्थिती नॉर्मल असून कुठलीही पॅनिक व्हावी अशी परिस्थिती नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, चीन सरकार जगाचा वेगळं चित्र का दाखवतंय?, असा प्रश्न आता सर्वांना पडलेला दिसतोय. काही ठिकाणी कोरोना परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र आहे, त्यामुळे चीनने (China) निर्बंध शिथील केले असावेत, असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …