हॉटेलमध्ये गेल्यावर अति खाणे टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स, वजन कमी करण्यासाठी होईल मदत

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवासात आहात किंवा तसा विचार करत असाल तर क्रेविंगवर कंट्रोल करणे ही तुमची पहिली पायरी असू शकते. अगदी तुम्ही कितीही चांगल्या, आवडत्या हॉटेलमधील पदार्थ खात असाल तेव्हा तुम्ही तुमच्या या ध्येयाला चिटकून राहणे तितकेच गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही काही ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकांना बाहेरचं जेवण नकोसं वाटतं कारण त्यामुळे वजन वाढण्याचा भीती वाटते. अशावेळी तुम्हाला सर्वात मोठा टास्क स्वतः कशाप्रकारे कंट्रोल करावं? हा वाटत असेल तर पुढे सांगत असलेल्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा.

पार्सल घेण्याची सवय लावा

हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही किती जण आहात त्या अनुशंगाने जेवण मागवा. अनेकदा आपण वेगवेगळे पदार्थ मागवायच्या नादात बरंच काही मागवून जातो. अशावेळी तुम्ही आधी ठरवून काही गोष्टी ऑर्डर करा. तसेच अनेकदा खूप पदार्थ मागवल्यावर ते बघूनही आपल्याला खायला होत नाही. अशावेळी तुम्ही पार्सल घेण्याची सवय लावून घ्या. फक्त ऑर्डर केलंय म्हणून खाल्लचं पाहिजे असा हट्ट न धरता जेवढं हवं तेवढं ताटात वाढून घ्या आणि बाकीचं पार्सल करून घ्या.

हेही वाचा :  नाकात बोटं घातल्यामुळे होतो धोकादायक आजार, आकुंचन पावतो मेंदू, ही असू शकतात प्राथमिक लक्षणं

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या प्रवासातील ४ बेस्ट टिप्स, यामुळे तुमचा प्रवास होईल अधिक सुखकर))

​हळू हळू खाऊन जेवणाचा आनंद घ्या

अनेकदा हॉटेलमध्ये खूप पदार्थ मागविले जातात. जेवणावरच प्रेम आणि वेगळा अनुभव म्हणून आपण उत्साहात बरंच खाऊन जातो. असं न करता तुम्ही प्रत्येक पदार्थाचा आनंद घेत हळू हळू खा. यामुळे तुम्ही जेवणाचा आनंदही घ्याल आणि कमी जेवण जेवाल. यामुळे तुम्हाला बाहेरच जेवणं पचणंही सोपं होतं आणि या सगळ्याचा शरीरावर विपरित परिणामही होत नाही.

(वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

​सलाडची पण ऑर्डर द्या

अनेकदा आपण ऑर्डर करताना सलाडचा विचार करत नाही. पण असं न करता सर्वात आधी तुम्ही सलाड मागवलं पाहिजे. तसेच अनेकदा स्टार्टर ऑर्डर केल्यावर सोबत काही भाज्या मिळतात. त्याचा देखील जेवणात समावेश करावा. सलाडमुळे तुमच्या जेवणाचा समतोल राखला जातो. सलाडने जर तुमचं अर्ध पोट भरलं तर इतर गोष्टींचा फार त्रास होत नाही.

(Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

हेही वाचा :  पुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव'

​भरपूर पाणी प्या

अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावर बोलण्याच्या किंवा उत्साहाच्या भरात खूप गप्पा मारतो. पण यावेळी तुम्ही शरीरातील पाण्याची पातळी देखील सांभाळून घेणे गरजेचे आहे. अशावेळी साथ किंवा कोमट पाणी हॉटेलमध्ये मिळाल्यास नक्कीच त्याचा समावेश करा. पाणी प्यायल्यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहतं. यामुळे इतर पदार्थ कमी खाल्ले जातात.

(वाचा – Winter Tips: रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिणे गुणकारी, बॉडी डिटॉक्ससह होतील हे ५ फायदे))

​जमल्यास स्वतःला हॉटेलपासून लांब ठेवा

वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी आयुष्यासाठी स्वतःला जंक फूड आणि हॉटेलिंगपासून लांब ठेवण्यात आलं तर तस नक्की करा. याचा सकारात्मक परिणामच होईल. त्यामुळे या ट्रिक्स नक्की फॉलो करा.

(वाचा – कोरोनाच्या ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटवर हा काढा ठरेल रामबाण उपाय, आयुर्वेदातील ५ फायदे))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …