second covishield dose can be taken between 8 16 weeks after first dose zws 70 | कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा ८ ते १६ आठवडय़ांदरम्यान


सध्या कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर १२ ते १६ आठवडय़ांदरम्यान देण्यात येते.

नवी दिल्ली : करोनाच्या कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर ८ ते १६ आठवडय़ांच्या दरम्यान देण्याची शिफारस लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) केली आहे. सध्या कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर १२ ते १६ आठवडय़ांदरम्यान देण्यात येते.

लसीकरणाबाबतची देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘एनटीएजीआय’ने केलेली ‘कोव्हिशिल्ड’बाबतची ही शिफारस अद्याप लागू करण्यात आलेली नाही. परंतु, अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत निर्णय घेतल्यास देशातील सहा ते सात कोटी लोकांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा वेगाने देता येईल.

कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी कमी करण्याबाबतची ‘एनटीएजीआय’ची नवी शिफारस अलीकडील जागतिक शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा आठ आठवडय़ांनी दिली काय किंवा १२ ते १६ आठवडय़ांच्या अंतराने दिली काय, निर्माण होणारी प्रतििपडे (अँटिबॉडीज रिस्पॉन्स) जवळजवळ समान असतात, असे या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.

‘एनटीएजीआय’च्या शिफारशींच्या आधारे सरकारने १३ मे २०२१ रोजी कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर ६ ते ८ आठवडय़ांवरून १२ ते १६ आठवडय़ांपर्यंत वाढवले होते.

हेही वाचा :  CM Letter:मुख्यमंत्र्यांच्या नावे 51 हजार पत्र लिहिली; काढली मोठी मिरवणूक, नक्की काय आहे प्रकरण?

कोव्हॅक्सिनबाबत बदल नाही

लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) अद्याप भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा घेण्याबाबत कोणताही बदल सुचवलेला नाही. या लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी दिली जाते.

राज्यात ११३ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाचे ११३ रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला़  मुंबई शहरात रविवारी करोनाचे २७ रुग्ण आढळल़े  शहरात दिवसभरात ४४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या २९८ झाली आह़े



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख’, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, ‘निवडणूक पूर्ण होऊन..’

Devendra Fadnavis Riot Planning Allegations: सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री …

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं …