‘एमआयएम भगव्याला विरोध करणारी संघटना, तडजोड शक्य नाही,’ शिवसेनेने जलील यांची ऑफर धुडकावली


एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे, असं दानवे म्हणाले.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का ? असे विचारले जातेय. मात्र, जलील यांच्या ऑफरनंतर शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली असून औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होऊ शकत नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी तर एमआयएमला जातीयवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीचा पक्ष म्हणत भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी शिवसेना जोडली जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

“एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे. भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी आम्ही कसे जोडले जाणार ? औरंगजेबासमोर हे लोक गुडघे टेकतात. अशा संघटनेशी शिवसेना कधीही जोडली जाणार नाही. भगव्याला विरोध करणारी संघटना आहे. या विचारांशी शिवसेना कधीही तडजोड करू शकत नाही आणि या प्रस्तावाचे शिवसेनेला कोणतेही देणेघेणे नाही, असे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहेत.

तसेच सरकार आणि संघटना हा वेगळा विषय आहे. भलेही महाविकास आघाडीसोबत शिवसेना असेल पण संघटना म्हणून शिवसेनेची वेगळी विचारसरणी आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही,” अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितलेय.

हेही वाचा :  एक्झिट पोलवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “खोटे सिद्ध होतील, यापूर्वीही…”

तसेच, यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील जलील यांच्या प्रस्तावानंतर प्रतिक्रिया दिली होती. एमआयएमसोबत जाणे शक्य नाही, असं राऊत यांनी म्हटलं होतं. “महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही,” असे संजय राऊत म्हणाले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती …

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …