इम्तियाज जलील यांची राष्ट्रवादीला ऑफर; छगन भुजबळ म्हणतात, “नक्कीच पवार साहेब…” |Chhagan Bhujbal reaction on Imtiaz jalil alliance offer


इम्तियाज जलील यांच्या युतीच्या ऑफरवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

भाजपाला हरवण्यासाठी एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा झाली, या चर्चेत त्यांनी ही युतीची ऑफर दिली आहे. जलील यांच्या या ऑफरची आज सकाळपासून चांगलीच चर्चा आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. २०२४मध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपाने महाराष्ट्राची सत्ता विसरावी, असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दानवेंचा गौप्यस्फोट; म्हणाले “निवडणुका लागल्या की…”

महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, “उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,  अशोक चव्हाण आणि सोनिया गांधी यांच्या आघाडीचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकणार आहे. पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही,” असा टोला भुजबळांनी लगावला.

हेही वाचा :  आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

तर, “इम्तियाज जलील एमआयएमचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आले, तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी  राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं, नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील,” असे भुजबळ म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …