“इस्लाम देशाचा खरा शत्रू”, संभाजी भिडेंच्या या विधानावर एमआयएमचं प्रत्युत्तर; म्हणे, “अशा प्रकारचा माणूस…”! | mim mp imtiyaz jaleel hit back sambhaji bhide on islam controversial statement


इम्तियाज जलील म्हणतात, “अजमल कसाबचा उद्देश बंदुकीच्या जोरावर देशाला कमकुवत करण्यााच होता, पण संभाजी भिडेंसारखे लोक…”

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडतात. मात्र, तरीदेखील आपल्या विधानांवर ते ठाम असतात. नुकतंच त्यांनी हिंदू-मुस्लीम धर्माविषयी केलेलं एक वक्तव्य वादाचा विषय ठरलं. यामध्ये संभाजी भिडे इस्लाम देशाचा खरा शत्रू असल्याचं म्हणत आहेत. या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून एमआयएम पक्षानं भिडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना संभाजी भिडेंवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना “ज्या इस्लामच्या पोटतिडकीतून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटलं आहे. “औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदीूस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं देखील संभाजी भिडे म्हणाले.

हेही वाचा :  जॉब स्विच करताय? मुलाखतीमध्ये तुम्हीच HR ला 'हे' 6 प्रश्न विचारा; आर्थिक फायदा निश्चित्त

“इस्लाम हा देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून…”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली असून एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी संभाजी भिडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “अशा प्रकारचा माणूस गुरुजी होऊ शकत नाही. लोकांना चांगलं ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणतो. अशा लोकांना आपण गुरुजी म्हणत नाही”, असं जलील म्हणाले आहेत.

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

अजमल कसाब आणि संभाजी भिडेंची तुलना

“अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी होता ज्यानं आपल्या देशावर हल्ला केला होता. बंदुकीच्या जोरावर आपल्या देशाला कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. पण यांच्यासारखे (संभाजी भिडे) लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. पण आपल्या जिभेचा वापर करतात. त्यांचा देखील उद्देश या देशाला कमजोर कसं करता येईल, समाजात तेढ कशी निर्माण करता येईल हाच आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …

22 हवाई मार्गांवर 1 हजारहून कमी विमान तिकीट, सर्वसामान्यही घेऊ शकणार आकाशात भरारी!

Cheapest Flight Ticket: आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा, आकाशात उड्डाण घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा …