अ‌ॅपलच्या मुख्यालयात गोंधळ, ‘या’ एका कारणामुळे कर्मचाऱ्यांना यावं लागलं बाहेर


खरबदारी म्हणून अॅपलच्या सर्वात मोठ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर यावे लागले.

जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच Apple चे प्रत्येक प्रोडक्ट विश्वासार्ह, वापरण्यास सोईचे असते. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची असलेली ही कंपनी सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील अॅपलच्या मुख्यालयात एका पांढऱ्या रंगाच्या पावडरमुळे गोंधळ उडाला. पांढऱ्या रंगाचे पावडर मिळाल्यामुळे खरबदारी म्हणून अॅपलचे सर्वात मोठे कार्यालय अशंत: रिकामे करावे लागले

अॅपलच्या सर्वात मोठ्या कार्यालयात नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार कॅलिफोर्निया येथे असलेल्या अॅपलच्या मुख्यालयात मंगळवारी एका बंद लिफाफ्यात पांढऱ्या रंगाचे पावडर दिसून आले. यावेळी फायर अलार्मदेखील वाजला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून अॅपलचे मुख्यालय अंशत: रिकामे करण्यात आले. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन विभागाने कार्यालयाची तत्काळ तपासणी केली. पूर्ण तपासणी केल्यानंतर कोणतीही धोकादायक वस्तू न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयात परत जाण्यास सांगण्यात आले होते.

ही घटना घडल्यानंतर अॅपल मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. कार्यालयात आढळलेल्या लिफाफ्यात कोणताही धोकादायक पदार्थ नव्हता. त्यामुळे सर्व कामे सुरळीत झाली असून मुख्यालय पूर्णपणे खुले आहे, असे कर्मचाऱ्यांना आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आले होते.

हेही वाचा :  'शिवाजी महाराज कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? बिल्किस बानो की..'; आव्हाडांचा भाजपाला सवाल

फक्त पांढऱ्या रंगाच्या पावडरमुळे अॅपलचे मुख्यालय अंशत: रिकामे करावे लागले. मात्र, मुख्यालयात सापडलेले पांढऱ्या रंगाचे पावडर म्हणजे नेमके काय होते, हे अजूनतरी स्पष्टपणे समजू शकलेले नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …