Celeb Hair Care: हेअरफॉलने अक्षरश: वैतागली होती ही अभिनेत्री, नव-याने सांगितलेले सीक्रेट उपाय वापरताच लांब व घनदाट झाले केस..!

हेअर केअर (hair care) हा सध्या कोणत्याही तरुणीसाठी कळीचा मुद्दा आहे. काहीही झालं तरी आपले केस हेल्दी राहावेत म्हणून प्रत्येक तरुणी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध उपाय वापरते, काय काय गोष्टी करते पण अर्थात प्रत्येक गोष्ट कामी येईलच असे नाही. तुम्ही सुद्धा असे अनेक उपाय करून पाहिले असतील आणि विविध गोष्टी करून केसांच्या समस्येबाबत तुम्हाला हवा तसा उपाय मिळाला नसेल किंवा तुम्ही समाधानी नसाल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत ज्या खुद्द दिव्यांका त्रिपाठी (divyanka tripathi) वापरते.

आता दिव्यांक कोण हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नकोच. तिला कोण ओळखत नाही. आजच्या तरुणींसाठी तर ती एक फॅशन आयकॉन आहे. दिव्यांका दिसायला सुंदर आहेच यात वाद नाही आणि तिच्या या सुंदरतेला अधिक खुलवतात तिचे लांबसडक आणि काळेभोर केस! पण असं काय ती करते की जेणेकरून तिचे केस एवढे भारी आहेत आणि हेल्दी आहेत. चला आज यामागचं सिक्रेटच जाणून घेऊया. (फोटो साभार: दिव्यांका त्रिपाठी)

केसांना असे देते पोषण

आपल्या केसांना पोषण देण्यासाठी दिव्यांक सप्लिमेंटचे सेवन करते. त्याबाबत तिने आपल्या अनेक युट्यूब व्हिडीओ मधून सुध्दा सांगितले आहे. बायोटिन युक्त या सप्लिमेंटचे सेवन केल्याने तिला स्वतःला आपल्या केसांमध्ये खूप फरक दिसला आहे. ती असे देखील सांगते की कित्येक तास शूटिंग आणि हिटिंग टूल्स मुळे केसांची अवस्था खूपच खराब होऊन जाते. अशावेळी केवळ हेल्दी डायट कामी येत नाही तर काही एक्स्ट्रा सुद्धा हवं असतं.

हेही वाचा :  महिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या

(वाचा :- chapati For Skin : शिळ्या चपातीचा करा असा वापर, एका वापरात चेहरा आरशासारखा लख्ख चमकेल व सुरकुत्याही नाहीशा होतील..!)

हेअर मास्कने करते डीप कंडिशनिंग

दिव्यांकाला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती आपल्या केसांना डीप कंडिशनिंग करते. आपल्या केसांचं टेक्शर कसं आहे ते लक्षात घेऊन ती न चुकता हेअर मास्क देखील अप्लाय करते. सामान्यत: लोक हेअर वॉश साठी साध्या थंड पाण्याचा वापर करतात पण दिव्यांका मात्र गरम पाण्यात वापर करते. ती गरम पाण्याने आपले केस धुते आणि मग कंडिशनिंग झाल्यावर नंतर केस हे थंड पाण्याने धुते. असे केल्याने केस शाईन होतात असे दिव्यांका सांगते.

(वाचा :- मेकअप प्रोडक्ट्स विकून दिवसाला करोडो रूपये कमावते ही महिला, कधीकाळी 10,000 ची नोकरी करण्याची आली होती वेळ..!)

सिल्की केसांसाठी हे करते

दिव्यांकाचे केस हे तिच्या अस्मानी सौंदर्यामधील प्रमुख आकर्षण आहेत. तिचे केस खूपच रेशमी, मुलायम आणि शाईनी आहेत. हेच कारण आहे की तिचे चाहते सुद्धा नेहमीच तिच्या घनदाट आणि सुंदर केसांचे रहस्य तिला विचारत असतात. यावर उत्तर देताना दिव्यांका नेहमीच त्यांना घरगुती उपाय सुचवते जे ती सुद्धा वापरते. यांपैकी एक उपाय म्हणजे कांद्याचा रस आणि ऐलोवेरा जेल होय. दिव्यांका खूप काळापासून शॅम्पू हा कांद्याच्या बियांपासून तयार झालेला वापरते. याचा मोठा फायदा तिला केसांसाठी झाला.

हेही वाचा :  'महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्...'; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

(वाचा :- korean beauty : उगाच नाही संपूर्ण जग कोरियन मुलींच्या मादकतेवर घायाळ, काचेसारखी त्वचा मिळवण्यासाठी करतात ‘ही’ कामे!)

दिव्यांकाचा मोलाचा सल्ला

दिव्यांका एक मौल्यवान गोष्ट सांगताना म्हणते की, महागडे तेल तुमच्या चांगल्या केसांची अजिबात गॅरंटी देत नाही. म्हणून महागड्या तेलाचा वापर करणे सोडा. त्यांच्या फंदात पडू नका. हा एक धंदा आहे आणि तुम्ही ग्राहक, त्यामुळे योग्य विचार करूनच पैसे खर्च करा.” हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब सुद्धा याबाबतीत समान मत मांडताना म्हणतात की तेल कधीच केस वाढवण्यात मदत करत नाही ते केवळ एक मॉइश्चराइजर म्हणून काम करते. त्यामुळे तेलाचा वापर डॅमेज कंट्रोल आणि केसांना मॉइश्चराइज करण्यासाठीच करा.

(वाचा :- Exclusive : वयाच्या 16व्या आई बनणारी ही साधीशी मुलगी आज आहे भारतातील सुप्रसिद्ध ब्युटी आयकॉन, एका टिपचे घेते लाखो रूपये!)

सतत पाणी पिते

एका जुन्या मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितले की ती शूटिंग दरम्यान किंवा तिच्या मोकळ्या वेळेतही भरपूर पाणी पिते. हा तिच्या नित्य दिनक्रमाचा भाग आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार तिच्या हातात नेहमी पाण्याची बाटली असते. याचा परिणाम केवळ त्वचेवरच नाही तर केसांवरही होतो. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी पाणी खूप महत्वाचे असते. हे केवळ त्वचेला हायड्रेटेड ठेवत नाही तर तुमचे केस आणि टाळू देखील आतून निरोगी ठेवते. केस निरोगी ठेवण्यासाठी स्कॅल्प हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा :  Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह 'या' जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी

(वाचा :- Hair Growth : 1 महिन्यात कंबरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस, टक्कल पडलेल्या जागीही येतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …