90 च्या दशकात WWE गाजवणारी रेसलर सनी सिच हिला 17 वर्षांची कैद, पाहा नेमकं प्रकरण काय?

Tammy Sunny Sytch : माजी WWE हॉल ऑफ फेमर टॅमी सनी सिच हिला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवत असलेल्या एका प्राणघातक अपघातासाठी आठ वर्षांच्या प्रोबेशनमध्ये होती. अशातच आता तिला 17 वर्ष जेलमध्ये काढावी लागणार आहे. मुखत्यार ऍशले टेरविलेगर यांनी सिचला जास्तीत जास्त 25 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी केली होती. सनी सिच हिला मानसिक आरोग्य समस्या असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. अशातच आता तिला सर्किट न्यायाधीश कॅरेन फॉक्समन यांनी सिचला दोषी ठरवलं असून 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सनी सिचच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे.

मार्च 2022 मध्ये झालेल्या एका जीवघेण्या कार अपघाताच्या संदर्भात तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अपघातात 75 वर्षीय ज्युलियन लाफ्रान्सिस लासेटरचा मृत्यू झाला. अपघातावेळी सिचच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेच्या साडेतीन पट होते. 50 वर्षीय सिचच्या शिक्षेत तिची तुरुंगवासाची मुदत पूर्ण झाल्यानंतर आठ वर्षांच्या प्रोबेशनचा समावेश आहे. तसेच टीएमझेडनुसार तिचा ड्रायव्हरचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. 

अनेक तास चाललेल्या सुनावणीनंतर वोलसिया काउंटी कोर्टरूममध्ये शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर सिचच्या डोळ्यात पाणी आलं अन् ती कोर्टरूममध्येच ढसाढसा रडली. सिचला डीडब्ल्यूआयच्या आरोपांशी संबंधित कमीतकमी सहा प्रसंगी अटक करण्यात आली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या जोडीदाराला कात्रीने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सिचने 1990 च्या दशकात WWE मध्ये सनी नावाने परफॉर्म केलं होतं. 90 च्या दशकात सनी सिचची दहशत होती. 2011 मध्ये तिचा WWE हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. अनेक लहान चिल्ल्यापिल्यांना सनीच्या मॅचची आवड असायची. तर खेळण्याच्या पत्त्यावर देखील तिच्या नावाची क्रेझ असल्याचं दिसून येत होतं.

हेही वाचा :  ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील (NCP) …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …