सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि… पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?

Kangana Ranaut Net Worth: ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’ या सारख्या चित्रपटातून बॉलिवूडवर आपली वेगळी छाप उमटवारी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) आता राजकीय क्षेत्रात एन्ट्री केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha Seat) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कंगनाने निवडणूक हा लोकशाहीचा सण असल्याचं सांगत मंडईतून निवडणूक लढवणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं.

राजकीय क्षेत्रात येण्याआधी कंगना विविध मुद्द्यांवर आपले राजकीय विचार मांडताना दिसत होती. आता तीने थेट राजकारणातच प्रवेश केला. कंगना रनौतचा भाजपच्या करोडपती उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. निवडणूक अर्जावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कंगना आपली संपत्ती जाहीर केली आहे. 

कंगना करोडोच्या संपत्तीची मालकिन
कंगना रनौतचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात झाला. कंगनाच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर प्रतिज्ञापत्रात 90 करोडोहून अधिक संपत्ती असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. 12 वी पास असलेल्या कंगनाकडे 2 लाख रुपयांची रोख, अनेक बँकेत खाती, सोनं, चांदी असं मिळून 28,73,44,239 ची जंगम मालमत्ता आहे. तर 62,92,87,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कंगनावर 17,38,00000 रुपयांच कर्ज आहे. 

हेही वाचा :  Jammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू

करोडो रुपयांचं सोनं
प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाकडे 6 किलो 700 ग्राम सोनं आणि दागिने आहेत. याची किंमत जवळपास 5 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय तिच्याकडे 60 किलो चांदी आहे. याची किंमत जवळपास 50 लाख रुपयात आहे. याशिवाय करोडो रुपयांची डायमंडचे दागिनेही आहेत, याची किंम 3 कोटी रुपयांहून जास्त आहे. 

कंगनाच्या ताफ्यात महागड्या आणि लक्झरी कारचं कलेक्शन आहे. यात BMW 7-सीरीज आणि Mercedes Benz GLE SUV कारचाही समावेश आहे. या दोन कारची किंमत जवळपास  1.56 इतकी आहे. 

कंगनाकडे 50 एलआयसी पॉलिसी
कंगनाच्या संपत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे कंगनाच्या नावावर चार-पाच नाही तर तब्बल 50 एलआयसी पॉलिसी (LIC Policies) आहेत. या सर्व पॉलीस 4 जून 2008 या एकाच तारखेला घेण्यात आल्यात. याशिवाय तीने शेअरमध्येही गुंतवणूक केली आहे. मनिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेचे 9999 शेअर तिच्याजवळ आहेत. त्यांची एकूण भांडवली गुंतवणूक 1.20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

चित्रपटातून मोठी कमाई
कंगना रनौत बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्टनुसार कंगना एका चित्रपटासाठी जवळपास 15 ते 25 करोड रुपये फिस घेते. फॅशन, राज 2, वन्स अपोन ए टाईम इन मुंबई, मणिकर्णिका आणि पंगा या चित्रपटातून तीने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

हेही वाचा :  मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, "मी लोकांसोबत..."

जाहीरातीतूनही करोडोंची कमाई
अभिनयातून करोडोंची कमाई करणारी कंगना जाहीरातूनही चांगली कमाई करते. रिपोर्टनुसार कंगना एका ब्रँडच्या जाहीरातीसाठी  3-3.5 कोटी रुपये चार्ज करते. याशिवाय कंगना दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माताही आहे.

मुंबई आणि मनालीत अलिशान घर
कंगना रनौतचा हिमाचल प्रदेश जवळच्या मनालीत शानदार बंगला आहे. याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय मुंबईत पाच बेडरुमचं अलिशान अपार्टमेंट आहे, ज्याच किंमत 15 ते 20 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतल्या पाली हिल इथं तिचं भव्य कार्यालय आहे, याची किंमतही करोडोत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुण्यातील (Pune) लोणावळा (Lonavla) येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी …

बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!

Bank Employee 5 Days Working: बॅंक कर्मचारी खूप मोठ्या काळापासून कामाचा 5 दिवसांचा आठवडा करण्याची …