2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्…; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली

ED Raid : गुजरातमधील (Gujarat Crime) गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान 1.62 कोटी रुपयांची रोकड, 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणदे या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपैकी सर्वाधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा सापडल्याची माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या मालमत्ता आणि परिसरात छापे टाकून 1.62 कोटी रुपये रोख आणि विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक रोख रक्कम 2,000 रुपयांच्या नोटांची होती. ईडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दमण आणि वलसाडसह गुजरातमधील नऊ निवासी आणि व्यावसायिक संकुलांवर छापे टाकण्यात आले होते.

छाप्यांदरम्यान, ईडीच्या पथकाने कागदपत्रे, पॉवर ऑफ अॅटर्नी, विविध आक्षेपार्ह कागदपत्रे, फर्म/कंपन्या/आस्थापनेशी संबंधित डिजिटल पुरावे आणि 100 हून अधिक मालमत्तांशी संबंधित रोख व्यवहार झालेली कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय ईडीला झडतीदरम्यान 3 बँक लॉकर्सही सापडले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात गुजरातमधील गुंड सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या नऊ निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापे टाकले होती. ईडाने यासोबतच दमण आणि वलसाडमध्ये कारवाई केली होती.

हेही वाचा :  'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले

“गुजरातच्या दमण आणि वलसाडमध्ये गुन्हेगार सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या नऊ निवासी आणि व्यावसायिक परिसरांच्या झडतीदरम्यान, ईडीने 1.62 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे, ज्यात 2000 रुपयांच्या चलनी नोटांमधील 1 कोटी रुपयांहून अधिक, 100 हून अधिक कागदपत्रे जप्त केली आहेत,” अशी माहिती ईडीने दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई सुरू आहे. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची ईडीकडून चौकशी होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्यावरही ईडीचे छापे पडले आहेत. कोविड घोटाळ्याबाबत ईडीची ही कारवाई सुरू आहे. कोविड महामारीच्या काळात अनेक कंपन्यांना रातोरात निविदा दिल्याचे आरोप होत आहेत आणि या आरोपांच्या तपासात विविध ठिकाणी ईडीचे छापे पडत आहेत.

हेही वाचा :  माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्....



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …