पक्ष्यांचा थवा ‘V’ आकारातच का उडतो? यामागचं कारण माहित पडलं म्हणजे समजा तुम्हीच स्कॉलर

Bird Flying V Shape Theory: ‘मी पक्षी झालो तर…’ किंवा ‘पक्षी झाले तर…’ अशा विषयांवर आपण शालेय जीवनात अनेकदा निबंध लिहिले असतील. आपल्याला पंख मिळून जर आपण पक्षी झालो तर नेमकं काय करु? ही कल्पनाच किती कमाल आहे ना? थोडक्यात आभाळात स्वच्छंदीपणे उडणाऱ्या, मैलोंचा प्रवास करणाऱ्या या पक्ष्यांप्रमाणे तुम्हालाही उडता आलं तर… याचा विचार करून भरभरून लिहायचं. 

पक्ष्यांना आकाशात उडताना पाहणं हा अनेकांचाच आवडता छंद. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, की हे पक्षी अनेकदा ‘V’ आकारातच का उडतात? थोडक्यात पक्षांचा थवा उडताना तुम्ही कधी पाहिला असेल, तर लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ते बरंच अंतर या आकारामध्येच कमालीच्या सुसंगतीने पुढे जातात. इथं कोणालाही कोणाच्याही पुढे निघण्याची घाई नसते. पण तुम्हाला माहितीये का, की हे पक्षी असं नेमकं का करतात? 

जाणून आश्चर्य वाटेल, पण आतापर्यंत या मुद्द्यावर बरीच संशोधनंही झाली असून तज्ज्ञांनी आपआपली मतंही मांडली आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या आजुबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारणं आहेत. अगदी पक्ष्यांच्या उडतानाच्या संलचनामागेही असंच एक कारण आहे. किंबहुना ही दोन कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे या आकारात उडण्यामुळं पक्ष्यांना या क्रियेत सहजता प्राप्त होते. शिवाय असं केल्यामुळं ते एकमेकांवर आदळतही नाहीत. 

हेही वाचा :  Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

वैज्ञानिकांचं काय म्हणणं? 

असं म्हणतात की पक्ष्यांच्या थव्यामध्ये एक प्रमुख पक्षी असतो. जो, उडताना संपूर्ण थव्याला योग्य मार्ग दाखवत असतो. पक्षी जेव्हाजेव्हा थव्यानं उडतात तेव्हातेव्हा हा प्रमुख पक्षी या थव्याच सर्वात पुढे असतो, तर इतर पक्षी त्याच्या मागे एका विशिष्ट रचनेत उडतात. थोडक्यात ज्याप्रमाणं एखादा गटप्रमुख त्यांच्या गटाला मार्गदर्शन करतो अगदी तसंच. 

 

इवल्याच्या पक्ष्यांच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची अशी प्रक्रिया नेमकी किती कमाल आहे हे लंडन विद्यापीठाच्या रॉयल वेटरनरी कॉलेजच्या संशोधनातूनही सिद्ध झालं आहे. पक्षी जेव्हा थव्यातून उडतात तेव्हा त्यांना हवा कापण्यास मदत होते. शिवाय सोबत उडणाऱ्या पक्ष्यांसाठीही ही प्रक्रिया सोपी असते. असं केल्यामुळं त्यांची ताकद व्यर्थ जात नाही, असं निरीक्षण या संशोधनातून समोर आलं. थव्यातच राहून, वावरून ते या आकारात उडण्याची सवय अंगी बाणवून घेतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …