कंगनाला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे? शेतकरी आंदोलनाशी संबंध

Who is kulwinder Kaur: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावण्यात आली. विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ महाल सुरक्षा रक्षकाने कंगनाशी वाद घालत तिच्या कानशिलात मारली. ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांच्या आसपास घडली. कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाचं नाव कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) असं आहे. या घटनेनंतर चंदीगड विमानतळावर (Chandigarh Airport) एकच खळबळ उडाली. कंगना रनौत विस्तारा एअरलाईन्सच्या फ्लाईटने दिल्लीत परतत असताना ही घटना घडली. घटना घडल्यानंतर कुलविंदर कौरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
दिल्लीला जाण्यासाठ कंगना रनौत चंदीगड विमानतळावर पोहोचली. यावेळी ड्यूटीवर तैनात असलेल्या सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरने कंगनाच्या कानशिलात (Slapped) लगावली. या घटनेने खळबळ उडाली. कुलविंदर कौरला इतर सुरक्षा रक्षकाने ताब्यात घेतलं. तर कंगनाने कुलविंदक कौर विरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. कुलविंदर कौरला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे. विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. 

हेही वाचा :  धक्कादायक! तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर; थरारक कारवाईत 5.43 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

कंगनाची पहिली प्रतिक्रिया
घटनेनंतर कंगना रनौतने पहिली प्रतिक्रिया दिलीय. तीन सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यात कंगना म्हणतेय, माझ्या चेहऱ्यावर मारण्यात आलं, मला शिव्या देण्यात आली. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधल्या आंतकवादाविषयी मी चिंतीत आहे’ 

दुसरीकडे कुलविंदर कौरचा ही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती आपला संपात व्यक्त करताना दिसतेय. ‘शेतकरी आंदोलनात माझी आई देखील सहभागी झाली होती. त्यावेळा कंगनाने आंदोलकांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं. यासाठीच मी कंगनाला कानशिलात मारलं’, असं या व्हिडिओत ती म्हणताना दिसतेय.

कोण आहे कुलविंदर कौर?
कुलविंदर कौर पंजाबी कुटुंबातील आहे. ती शेतकरी कुटुंबातील आहे आणि स्वत:ही आंदोलक समर्थक आहे. कुलविंदर कौर सीआयएसएफमध्ये भरती झाली. सध्या ती चंदीगड विमानतळावर तैनात होती. इतर सहकाऱ्यांबरोबर ती ड्यूटीवर होती. पण ज्यावेळी कंगना विमानतळावर पोहोचली त्यावेळी कुलविंदर कौरचा संयम सुटला आणि तीने कंगनाच्या कानशिलात लगावली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आली आहे.

दरम्यान, कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीत दाखल झाली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाने काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव केला. 

हेही वाचा :  Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? …

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …