14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनांना मिळणारी पसंती लक्षणीयरित्या वाढली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल, आपलीशी वाटेल आणि सहाजिकच खर्चाचा मारा करणार नाही, अशाच कार खरेदीला भारतीयांकडून प्राधान्य दिलं जातं. भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेता कार उत्पादक कंपन्यानं या आणि अशा इतरही अनेक घटकांसह देशातील रस्त्यांना अनुसरून काही कारचे मॉडेल बाजारात आणले गेले. यामध्ये एसयुव्ही कारना मिळणारी पसंती तुलनेनं जास्त होती. ज्यामुळं कमी दरात मिळणाऱ्या कारची मागणीही घटली. 

एसयुव्हीच्या या दिवसांमध्ये जर, कोणी टक्कर दिली असेल तर ती म्हणजे कारच्याच MPV मॉडेलनं. एमपीव्ही कारचं सोपं समीकरण म्हणजे या पद्धतीच्या मॉडेलमध्ये तुमचं संपूर्ण कुटुंबही सहज सामावू शकतं. याशिवाय तुम्ही या कारचा वापर प्रवासासोबतच व्यावसायिक कारणांसाठीसुद्धा करू शकता. त्यामुळं 5 आणि 7 सीटर कार खरेदीच्या विचारात असाल, तर आधी जरा या 8 सीटर एमपीव्हीचे पर्यायही पाहून घ्या. कारण, इथं किंमतही तुमच्या अपेक्षेनुसारच आहे बरं… 

Mahindra Marazzo: 

8 प्रवासी आसन क्षमता असणाऱ्या कारच्या यादीत येणारी पहिली कार होती, महिंद्रा मराझ्झो. महिंद्राची पहिलीच एमपीव्ही असणाऱ्या या कारमध्ये अनेक फिचर्स आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत आहे 14.40 लाख रुपये. 1.5 लीटर डिझेल इंजिन असणाऱ्या या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जातो. 

हेही वाचा :  'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Toyota Innova Hycross:

या यादीत येणारी दुसरी कार आहे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस. 7 आणि 8 सीटर अशा दोन पर्यायात ही कार उपलब्ध आहे. या कारचं 8 सीटर व्हेरिएंट 19.82 लाख रुपयांना उपलब्ध असून, त्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. 

Toyota Innova Crysta: 

टोयोटा इनोवा या ग्रहाकांच्या कायम पसंती मिळणाऱ्या कारमध्येही 7 आणि 8 सीटर व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या कारचं 8 सीटर व्हेरिएंट 19.99 लाख रुपयांना उपलब्ध आहे. 

Maruti Invicto: 

मारुतीची एक कारही 8 सीटर कारच्या यादीत असून, यामध्ये मारुती इनविक्टोचाही समावेश आहे. 7 ते 8 सीटर कारच्या पर्यायामध्येही ही कार उपलब्ध असून, कारच्या 8 सीटर व्हेरिएंटसाठी 25.35 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे. या कारमध्ये 2.0 लीटरचं पेट्रोल इंजिन असून, त्यातून 173PS ची पॉवर जनरेट होते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक असे पर्याय उपलब्ध आहेत.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विमानात असते ‘ही’ सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमानानं प्रवास करत असताना तिकीट काढण्यापासून संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर अगदी …

Vivo Y58 5G अखेर भारतात लाँच, 50MP कॅमेऱ्यासह 6000mAh ची बॅटरी, किमत फक्त…

Vivo Y58 5G Price in India: विवोने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा …